महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 24, 2019, 8:10 AM IST

ETV Bharat / sports

पाकिस्तान भारतापेक्षा सुरक्षित, पीसीबी अध्यक्ष एहसान मनी यांची मुक्ताफळे

पाकिस्तानात श्रीलंका क्रिकेट संघावर २००९ मध्ये अतिरेकी हल्ला झाला होता. त्यानंतर पाकिस्तानमध्ये खेळण्यास सर्वच संघांनी नकार दिला. तेव्हा तब्बल १० वर्षांनंतर श्रीलंका संघाला अनेकदा विनंत्या करून पाकिस्तानने दौऱ्यावर बोलावले. हा दौरा झाल्यानंतर लगेच 'पीसीबी'चे अध्यक्ष एहसान मनी यांनी पाकिस्तानातील सुरक्षा भारतापेक्षा अधिक चांगली असल्याचे सांगितले.

India a far greater security risk than Pakistan, says PCB chief Ehsan Mani
पाकिस्तान भारतापेक्षा सुरक्षित, पीसीबी अध्यक्ष एहसान मनी यांची मुक्ताफळे

इस्लामाबाद - पाकिस्तानमध्ये अतिरेकी कारवायामुळे तब्बल १० वर्षांपासून ठप्प असलेले तेथील क्रिकेट श्रीलंकेच्या दौऱ्यामुळे कसेबसे सुरू झाले. या वर्षी झेड प्लस सुरक्षा व्यवस्थेत लंकेच्या संघाने दौरा केला. मात्र, तरीही पाकिस्तानपेक्षा भारतच अधिक असुरक्षित असल्याची, मुक्ताफळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष एहसान मनी यांनी सोमवारी उधळली.

पाकिस्तानात श्रीलंका क्रिकेट संघावर २००९ मध्ये अतिरेकी हल्ला झाला होता. त्यानंतर पाकिस्तानमध्ये खेळण्यास सर्वच संघांनी नकार दिला. तेव्हा तब्बल १० वर्षांनंतर श्रीलंका संघाला अनेकदा विनंत्या करून पाकिस्तानने दौऱयावर बोलावले. हा दौरा झाल्यानंतर लगेच 'पीसीबी'चे अध्यक्ष एहसान मनी यांनी पाकिस्तानातील सुरक्षा भारतापेक्षा अधिक चांगली असल्याचे सांगितले.

श्रीलंका दौऱ्यानंतर पाकिस्तान आता क्रीडा विश्वासाठी सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. या विषयी बोलताना एहसान मनी यांनी सांगितलं की, 'श्रीलंका दौरा म्हणजे पाकिस्तान क्रिकेटसाठी महत्त्वपूर्ण टप्पा आहे. क्रीडा विश्वात पाकिस्तानची प्रतिमा उंचावण्यासाठी मीडिया व चाहत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

दरम्यान, श्रीलंका दौऱ्यानंतर आता बांगलादेशच्या संघाने पाकिस्तानचा दौरा करावा असे आवाहन मनी यांनी केले आहे. पण त्यांनी भारतापेक्षा पाकिस्तान सुरक्षित असल्याचे सांगताच नेटीझन्सनी त्यांना ट्रोल करण्यास सुरूवात केली.

हेही वाचा -ऑस्ट्रेलियाच्या दशकातील सर्वोत्तम कसोटी संघाचे कर्णधारपद कोहलीकडे

हेही वाचा -नसीम शाहचा पराक्रम, कसोटीत ५ बळी घेणारा ठरला युवा वेगवान गोलंदाज

ABOUT THE AUTHOR

...view details