म्हैसूर - भारत 'अ' संघाने इंग्लंड लॉयन्स संघाचा दुसऱ्या अनौपचारिक सामन्यात एक डाव आणि ६८ धावांनी दणदणीत पराभव केला. विजेत्या संघाचा फिरकी गोलंदाज मयंक मार्कंडेय इंग्लंडच्या संघास आपल्या फिरकी जाळ्यात ओढत ३१ धावा देत ५ गडी बाद केले. २ सामन्यांच्या मालिकेत भारत 'अ' संघाने ही मालिका १-० अशा फरकाने आपल्या नावावर केली.
मयंक मार्कंडेयच्या जाळ्यात फसले इंग्लंडचे 'लॉयंस', भारत 'अ' संघाचा डावाने विजय - मयंक मार्कंडेय
. फॉलोऑन खेळण्यास उतरलेल्या पाहुण संघाचा दुसरा डाव १८० धावांवर गडगडला.
ऑफ स्पिनर जलज सक्सेना ४० धावा देत २ गडी बाद केले. शाहबाज नदीम, वेगवान गोलंदाज वरुण आरोन आणि नवदीप सैनी यांनी प्रत्येकी एक गडी बाद करत संघाला यश मिळवून दिले. भारत 'अ' संघाच्या अभिमन्यू ईश्वरनने ११७ तर कर्णधार लोकेश राहुल ८१ तर प्रियांक पांचाल ५० धावांच्या जोरावर पहिल्या डावात ३९२ धावा केल्या. प्रतिउत्तरात इंग्लंड लॉयन्सचा संघ १४४ धावांवर गारद झाला. त्यामुळे इंग्लंडच्या संघास फॉलोऑन मिळाले. फॉलोऑन खेळण्यास उतरलेल्या पाहुण संघाचा दुसरा डाव १८० धावांवर गडगडला.
इंग्लंडचे फलंदाज भारतीय फिरकीपुढे संघर्ष करताना दिसून आले. त्यातील केवळ ४ फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला. बेन डकेटने सर्वाधिक ५० तर लुई ग्रेगरी ४४ धावांचे योगदान दिले. दोन्ही संघात यापूर्वी झालेला पहिला सामना अनिर्णित झाला होता. तर पाच सामन्याच्या एकदिवसीय मालिकेतही भारत 'अ' संघाने इंग्लंड लॉयन्सवर विजय मिळवत मालिका ४-१ अशी जिंकली.