नवी दिल्ली - भारतीय आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील महिला संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. या सामन्यातील पहिला सामना बुधवारी बडोदा येथे रंगणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाला दुखापतीमुळे या मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे.
स्मृतीला रविवारी सरावादरम्यान, दुखापत झाली. त्यामुळे तिला आफ्रिकेविरुध्दच्या मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. स्मृती मानधना लयीत असल्याने, त्याच्या माघारमुळे भारतीय संघाची डोकेदुखी वाढली आहे. मागील १८ सामन्यात खेळताना स्मृतीने ६७.८६ च्या सरासरीने १०१८ धावा केल्या आहेत. यात दोन शतकं आणि १० अर्धशतकांचा समावेश आहे. मात्र, आफ्रिकेविरुध्दच्या भारताने जिंकलेल्या टी-२० मालिकेत स्मृतीला चांगली कामगिरी करता आलेली नव्हती.
दरम्यान, नुकतीच पार पडलेली आफ्रिकेविरुध्दची ५ सामन्यांची टी-२० मालिका भारताने ३-१ ने जिंकली होती. या संपूर्ण मालिकेत स्मृती अवघ्या ४६ धावा करु शकली होती. स्मृतीला २०१८ ला आयसीसीचा बेस्ट महिला एकदिवसीय खेळाडू पुरस्कार मिळालेला असून तिने एकदिवसीय क्रमवारीत अव्वलस्थानही पटकावले होते.
भारतीय संघ -