एंटीगुआ - ऑस्ट्रेलिया विरुध्द वेस्ट इंडीज महिला संघातील एकदिवसीय मालिकेच्या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमान विडींजचा ८ गडी राखून पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय मालिकेवर ३-० ने कब्जा करत विडींजला 'क्लीन स्वीप' केले. सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वेगवान स्विंग गोलंदाज मेगन शट हिने हॅट्रिक घेत महिला क्रिकेटमध्ये इतिहास रचला.
हेही वाचा -SL VS PAK : खेळाडूंच्या विरोधानंतरही श्रीलंकेचा संघ करणार पाकिस्तान दौरा
वेस्ट इंडीजच्या नॉर्थ साउंडमध्ये खेळवण्यात आलेला शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाने भेदक गोलंदाजीच्या बळावर जिंकला. ऑस्ट्रेलिया संघाच्या भेदक माऱ्यासमोर विंडीजचा संघ १८० धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाने हे माफक लक्ष्य ३१.२ षटकात २ गड्याच्या मोबदल्यात सहज पार केले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाची मेगन शटने हॅट्रिक घेत विडींजच्या संघाला खिंडार पाडले.
हेही वाचा -पाकिस्तान खोटारडा... भारतावर आरोप करणाऱ्या पाकला श्रीलंकेचे खडेबोल
मेगनने ५० व्या षटकात हा कारनामा केला. मेगनने १० षटकात २४ धावा देत ३ गडी बाद केले. मेगन ऑस्ट्रेलियाकडून हॅट्रिक घेणारी पहिलीच खेळाडू बनली आहे. एवढेच नाही तर मेगनने टी-२० सामन्यात भारता विरुध्द हॅट्रिक घेतली होती. एकदिवसीय आणि टी-२० प्रकारात हॅट्रिकचा कारनामा करणारी मेगन जगातील पहिली खेळाडू ठरली आहे.