अँटिग्वा- वेस्ट इंडीज विरुध्दच्या पहिल्या कसोटी सामन्यात ईशांत शर्माने भेदक गोलंदाजी करत विंडीजचे ५ गडी तंबूत धाडले. यामुळे विंडीजची अवस्था दुसऱ्या दिवसाअखेर ८ बाद १७९ धावा अशी झाली आहे. पहिल्या डावात वेस्ट इंडिजचा संघ अद्याप १०८ धावांनी पिछाडीवर आहे.
दुसऱ्या दिवशीचे हिरो ठरले भारतीय फलंदाज रविंद्र जडेजा आणि गोलंदाज ईशांत शर्मा. जडेजाने अर्धशतक झळकावत भारतीय संघाला सन्माजनक धावसंख्या उभारुन दिली. तर गोलंदाजी ईशांत शर्माने ५ गडी बाद करुन सामन्यात भारताचे पारडे जड केले.
पहिल्या डावात प्रथम फलंदाजी करताना भारताने सर्वबाद २९७ धावा केल्या आहेत. यात अजिंक्य राहणे (८१) आणि रविंद्र जडेजा (५८) यांनी अर्धशतकी खेळी केली. भारताच्या या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजने सावध सुरुवात केली. सलामीवीर ब्रेथवेट आणि कँपबेल यांनी ३६ धावांची भागीदारी केली. तेव्हा मोहम्मद शमीने कँपबेलला २३ धावांवर बाद करत ही भागीदारी तोडली. त्यानंतर ईशांत शर्माने भेदक गोलंदाजी केली आणि ४२ धावांमध्ये विंडीजचे ५ गडी बाद केले.