महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IND VS WI TEST : वेस्ट इंडीजला धक्का, किमो पॉलने घेतली दुखापतीतून माघार

भारत आणि विंडीज यांच्यात आजपासून टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेअंतर्गत कसोटी मालिकेला सुरुवात होणार असून, या मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वीच वेस्ट इंडीज संघाला मोठा धक्का बसला आहे. विंडीजचा मध्यमगती गोलंदाज किमो पॉल याला सामन्यातून माघार घ्यावी लागली आहे. त्याच्या जागी मिग्युअल कमिन्स याला संघात स्थान देण्यात आले आहे.

IND VS WI TEST : वेस्ट इंडीजला धक्का, किमो पॉलने घेतली दुखापतीतून माघार

By

Published : Aug 22, 2019, 3:05 PM IST

Updated : Aug 22, 2019, 3:17 PM IST

अँटिग्वा- भारत आणि विंडीज यांच्यात आजपासून टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेअंतर्गत कसोटी मालिका सुरू होणार आहे. यामुळे या कसोटी मालिकेला एक वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे. मात्र, या मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वीच वेस्ट इंडीज संघाला मोठा धक्का बसला आहे. विंडीजचा मध्यमगती गोलंदाज किमो पॉल याला सामन्यातून माघार घ्यावी लागली आहे. त्याच्या जागी मिग्युअल कमिन्स याला संघात स्थान देण्यात आले आहे.

विंडीजच्या क्रिकेट मंडळाने दिलेल्या महितीनुसार, किमो पॉल यांच्या डाव्या पायाला दुखापत झाली आहे. यामुळे किमोला सामन्यातून माघार घ्यावी लागली. त्याच्या जागी २८ वर्षीय मिग्युअल कमिन्सला संधी देण्यात आली आहे.
किमो पॉलच्या ठिकाणी जागेवर संघात संधी देण्यात आलेल्या मिग्युअल कमिन्सने ३ वर्षांपूर्वी भारताविरूद्धच्या सामन्यातून क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

दरम्यान, भारत विरुध्द वेस्ट इंडीज संघामध्ये २ कसोटी सामने होणार असून टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत गुणांचे खाते उघडण्यासाठी दोनही संघ उत्सूक आहेत.

भारत-वेस्ट इंडीज कसोटी सामने -
पहिला कसोटी सामना - २२ ते २६ ऑगस्ट
दुसरा सामना - ३० ऑगस्ट ते ४ सप्टेंबर

Last Updated : Aug 22, 2019, 3:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details