चेन्नई - वेस्ट इंडीज विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने विंडीज कर्णधार केरॉन पोलार्डला शिवी दिली. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
घडलं असे की, भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. लोकेश राहुल आणि रोहित शर्मा ही सलामीवीर जोडी मैदानात होती. तेव्हा विंडीज कर्णधार केरॉन पोलार्ड रोहित शर्माशी बोलायला आला. पोलॉर्ड आणि रोहितमध्ये मजेशीर संवाद झाला. कारण संवाद सुरू असताना पोलार्ड हसताना दिसला. पण पोलार्ड तेथून गेल्यावर मात्र रोहितने जोडीदार राहुलकडे पाहत पोलार्डला शिवी दिली.
दरम्यान, चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर रंगलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीजने भारतावर आरामात विजय मिळवला. भारताने दिलेले २८८ धावांचे आव्हान वेस्ट इंडीजने ८ गडी राखून सहज पूर्ण केले. शेमरॉन हेटमायर आणि सलामीवीर शाय होप यांनी दुसऱ्या गड्यासाठी २१८ धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी केली.