अँटिग्वा - वेस्ट इंडीज विरुध्दच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडीजवर ३१८ धावांनी विजय मिळवत टेस्ट चॅम्पियनशिपचा विजयी शुभारंभ केला आहे. या विजयानंतर भारतीय संघ आयसीसीच्या कसोटी टेस्ट चॅम्पियनशिपच्या क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. दणदणीत विजयानंतर कर्णधार विराट कोहली आणि खेळाडू खास कॅरेबियन व्दिपवर संध्याकाळी क्रुजवर बसून मस्ती करताना दिसले.
केएल राहुलने आपल्या ट्विटर अकाऊंट वरुन संघातील खेळाडूसोबत क्रुझवर मस्ती करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये विराट कोहली तिची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत दिसत आहे. राहुलने शेअर केलेल्या फोटोमध्ये विराट कोहली, अनुष्का शर्मा, केएल राहूल, मयंक अग्रवाल, आर अश्विन दिसत आहे. हे सगळे फोटो काढताना आनंद व्यक्त करत असताना दिसत आहेत.