हैदराबाद- वेस्ट इंडीज विरुद्धच्या दुसरा एकदिवसीय सामना भारतीय संघाने १०७ धावांनी जिंकला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. विंडीज कर्णधार केरॉन पोलार्डने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तेव्हा भारतीय संघाने ५० षटकात ५ बाद ३८७ धावांचा डोंगर उभारला. तेव्हा प्रत्त्युतरादाखल विंडीजचा संघ ४३.३ षटकात सर्वबाद २८० धावा करु शकला. दरम्यान, भारताच्या या विजयात कोणत्या खेळाडूंनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. ते वाचा...
रोहित शर्मा -
पहिल्या सामन्यात अपयशी ठरल्यानंतर रोहित शर्माने दुसऱ्या सामन्यात शतकी खेळी केली. त्याने या सामन्यात १३८ चेंडूत १७ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने १५९ धावा केल्या. त्याने केएल राहुलसोबत पहिल्या विकेटसाठी २२७ धावांची भागिदारी केली.
केएल राहुल -
भारताचा दुसरा सलामीवीर फलंदाज केएल राहुलने या सामन्यात शतक झळकावलं. त्याचे हे एकदिवसीय कारकिर्दीतील चौथे शतक ठरले. शिखर धवनला झालेल्या दुखापतीमुळे संघात संधी मिळालेल्या राहुलने टी-२० पाठोपाठ एकदिवसीय मालिकेतही दमदार कामगिरी केली. त्याने दुसऱ्या सामन्यात १०४ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १०२ धावा केल्या.