महाराष्ट्र

maharashtra

IND VS WI: भारताचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय; मालिकेत 1-0 ने आघाडी

By

Published : Aug 26, 2019, 1:51 AM IST

Updated : Aug 27, 2019, 8:04 PM IST

भारत आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने विंडिजवर दणदणीत विजय मिळवला आहे. दोन कसोटी सामन्याच्या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

जसप्रित बुबरा

अँटिग्वा- भारत आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने विंडिजवर दणदणीत विजय मिळवला आहे. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर विंडिज संघाला 100 धावातच गुंडाळणे शक्य झाले. भारतीय स्टार गोलंदाज जसप्रित बुबराह 5 गडी बाद करत उत्तम कामगिरीचे प्रदर्शन केले. इंशात शर्माने 3 आणि मोहम्मद शमी यांने 2 गडी बाद केले.

चौथ्या दिवशी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने वेस्ट इंडिज समोर 419 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्षाचा पाठलाग करताना विंडिजच्या फलंदाजांनी अंत्यत निराशाजनक सुरुवात केली. इंडिजने अवघ्या 15 धावांत 5 खेळाडू गमावले होते. त्यांतर आलेल्या फलंदाजांनाही चांगली खेळी करता आली नाही. केमार रोच आणि कमीन्स यांनी दहाव्या विकेटसाठी 50 धावांची भागिदारी केली. मात्र, त्यांची खेळी व्यर्थ ठरली. विंडिज संघ अवघ्या 100 धावात सर्वबाद झाला. दोन कसोटी सामन्याच्या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

Last Updated : Aug 27, 2019, 8:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details