कटक - वेस्ट इंडीज विरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्यातून भारताचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीनं आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. दीपक चहरला दुखापत झाल्याने, सैनीची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.
Ind Vs Wi ३rd ODI : नवदीप सैनी ठरला भारताचा २२९ वा खेळाडू
नवदीप सैनीने भारताकडून आतापर्यंत ५ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले आहे. आज वेस्ट इंडीजविरुद्ध त्यानं एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सामन्यापूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहलीने सैनीला पदार्पणाची कॅप दिली. सैनी भारतासाठी एकदिवसीय क्रिकेट खेळणारा २२९ वा खेळाडू ठरला.

भारत आणि वेस्ट इंडीज संघात ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. विंडीजने चेन्नईच्या पहिल्या सामन्यात भारताला पराभवाचा धक्का दिला. त्यानंतर भारतीय संघाने विशाखापट्टमणच्या सामन्यात १०७ धावांनी धूळ चारत पराभवाची परतफेड केली. आता कटकला तिसरी आणि अखेरची लढत जिंकून वेस्ट इंडिजविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे.
- भारतीय संघ -
- रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, केदार जाधव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव आणि नवदीप सैनी.
- वेस्ट इंडीजचा संघ -
- केरॉन पोलार्ड (कर्णधार), एव्हिन लुईस, शाय होप, खैरी पियरे, रोस्टन चेस, अल्झारी जोसेफ, शेल्डन कॉट्रेल, निकोलस पूरन, शिमरान हेटमेयर, जेसन होल्डर आणि कीमो पॉल.