विशाखापट्टणम- भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने वेस्ट इंडीज विरूद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावले. त्याने सामन्यातील ३४ व्या षटकात कारकिर्दीतील २८ वे शतक पूर्ण केले. या शतकासह तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्यांंमध्ये भारताकडून तिसरा आणि जगातील चौथा फलंदाज ठरला. या सामन्यात रोहित शर्माने १३८ चेंडूत १५९ धावा केल्या. त्याच्या खेळीत त्याने १७ चौकार आणि ५ षटकार ठोकले. या सामन्यात रोहितने 138 चेंडूत 159 धावा केल्या. या खेळीत त्याने 17 चौकार आणि ५ षटकार ठोकले.
रोहितने दक्षिण आफ्रिकेचा हाशीम आमला याला याबाबतीत मागे टाकले. आमलाने २७ शतके केली आहेत. रोहितने या यादीत श्रीलंकेचा सनथ जयसुर्या याच्या २८ शतकांशी बरोबरी साधली.
रोहित शर्माचे वर्ष २०१९ मधील हे ७ वे एकदिवसीय शतक आहे. त्याने वर्षभरात सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत डेव्हिड वॉर्नर आणि सौरव गांगुली यांची बरोबरी केली. गांगुली आणि वॉर्नरने अनुक्रमे वर्ष २००० आणि २०१६ मध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रत्येकी ७ शतके केली होती. या प्रकरणात, पहिले स्थान सचिनचे आहे, सचिनने १९९८ मध्ये एकूण ९ शतके केली होती.
रोहितचे क्रिकेटच्या सर्व प्रकारातील हे ३८ वे शतक आहे. यात त्याने एकदिवसीयमध्ये २८, कसोटीत ६ आणि टी-२० त ४ शतके केली आहेत.
विक्रमी शतकासह रोहित २०१९ मध्ये १३०० हून अधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. यापूर्वी त्याने २०१३ मध्ये १२९३ धावा केल्या होत्या. षटकारांच्या बाबतीत रोहित शर्माने भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीलाही मागे टाकले. त्याने आतापर्यंत ११६ सामन्यात १८८ षटकार ठोकले आहे. तर धोनीच्या नावे १८६ षटकार आहेत.