महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Ind vs Wi : विराट हैदराबादला रवाना, वेस्ट इंडीजचा संघ सरावाला लागला - वेस्ट इंडीजचा भारत दौरा

विराटने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन एक फोटो शेअर केला असून त्यात विराटसह लोकेश राहुल आणि युवा खेळाडू शिवन दुबे दिसत आहेत. दरम्यान, वेस्ट इंडीजचा संघ आधीच हैदराबादला पोहोचला असून आज विडींज खेळाडूंनी सराव केला.

IND VS WI 1st T20I : Virat jets off to Hyderabad with KL Rahul and Shivam Dube
Ind vs Wi : विराट हैदराबादला रवाना, वेस्ट इंडीजचा संघ सरावाला लागला

By

Published : Dec 3, 2019, 9:24 PM IST

हैदराबाद - भारतीय संघ हैदराबाद येथून वेस्ट इंडीज विरुध्दच्या टी-२० मालिकेला सुरूवात करणार आहे. उभय संघात ६ डिसेंबरला पहिला टी-२० सामना होणार असून या सामन्यासाठी भारतीय कर्णधार विराट कोहली हैदराबादला रवाना झाला.

विराटने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन एक फोटो शेअर केला असून त्यात विराटसह लोकेश राहुल आणि युवा खेळाडू शिवन दुबे दिसत आहेत. दरम्यान, वेस्ट इंडीजचा संघ आधीच हैदराबादला पोहोचला असून आज विडींज खेळाडूंनी सराव केला.

भारत-वेस्ट इंडीज संघात ३ सामन्याची टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहे. मालिकेतील पहिला सामना ६ डिसेंबरला हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. यासाठी विराट आपल्या सहकाऱ्यांसोबत हैदराबादला रवाना झाला. पहिल्या सामन्याआधी वेस्ट इंडीजच्या संघाने आज सराव केला.

भारत वेस्ट इंडीज संघातील टी-२० मालिकेचे वेळापत्रक -
६ डिसेंबर - हैदराबाद
८ डिसेंबर - तिरुवनंतपुरम
११ डिसेंबर - मुंबई

हेही वाचा -पाकिस्तानचा लाजिरवाणा विक्रम, बांगलादेशला मागे टाकत पटकावलं अव्वलस्थान

हेही वाचा -विश्वविजेत्या इंग्लंडला नव्हे तर, न्यूझीलंडला मिळाला 'हा' महत्वाचा पुरस्कार

ABOUT THE AUTHOR

...view details