महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

है तैयार हम! विराट सेना 'क्लीन स्वीप'सह ४० गुणांच्या कमाईसाठी मैदानात

दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील अखेरचा कसोटी सामना रांचीच्या मैदानात रंगला आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ 'क्लीन स्वीप'च्या इराद्याने मैदानात उतरला आहे.

है तैयार हम...! विराट सेना 'क्लीन स्वीप'सह ४० गुणांच्या कमाईसाठी मैदानात

By

Published : Oct 19, 2019, 7:34 AM IST

Updated : Oct 19, 2019, 11:25 AM IST

रांची - दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील अखेरचा कसोटी सामना रांचीच्या मैदानात रंगला आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ आफ्रिकेला 'क्लीन स्वीप' देण्याच्या इराद्याने मैदानात उतरला आहे. तसेच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील महत्त्वपूर्ण ४० गुण संपादन करण्याच्या निर्धार विराट सेनेचा आहे.

भारताने मालिकेतील विशाखापट्टणम आणि पुणे येथील सामना जिंकत मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. हा सामना औपचारिक वाटत असला तरी विजयामुळे भारतीय संघ ४० गुणांची कमाई करेल. पहिल्या दोन्ही सामन्यात प्रत्येक क्षेत्रात भारताने वर्चस्व गाजवले होते. दरम्यान, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताचे चार सामन्यातून २०० गुण, तर न्यूझीलंड व श्रीलंका यांचे प्रत्येकी १४० गुण आहेत.

आफ्रिकेविरुध्दच्या मालिकेत फलंदाजीसह गोलंदाजीतही भारतीय संघ आघाडीवर आहे. फिरकीपटूंसह वेगवान गोलंदाजांनीही मालिकेत चांगली कामगिरी केली. उमेश यादव याने पुण्यात चांगला मारा केला तर ऋषभ पंतच्या ठिकाणी संघात वर्णी लागलेल्या यष्टिरक्षक-फलंदाज रिद्धिमान साहा याने अप्रतिम झेल टिपले. यामुळे भारतीय संघाचे पारडं जड मानलं जात आहे.

भारतीय संघाने शुक्रवारी कस्सून सराव केला. तर दुसरीकडे फलंदाज एडन मार्क्रम आणि फिरकीपटू केशव महाराज जखमी झाल्याने दक्षिण आफ्रिका संघाच्या समस्या वाढल्या आहेत. गोलंदाजीत कागिसो रबाडा, व्हर्नोन फिलॅन्डर आणि एन्रिच नॉर्टजे यांना भारतीय फलंदाजांना रोखण्यात अपयश आले आहे.

  • भारतीय संघ- विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, रिद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन,रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, रिषभ पंत आणि शुभमन गिल.
  • दक्षिण आफ्रिकेचा संघ - फाफ डु प्लेसिस (कर्णधार), तेम्बा बावुमा (उप कर्णधार), थेनिस डी ब्रुइ, क्वींटन डिकॉक, डीन एल्गर, झुबेर हमजा, जॉर्ज लिंडे, सेनुरन मुथुस्वामी, लुंगी एनगिडी, एरिक नॉर्टजे, व्हर्नोन फिलॅॅन्डर, डेन पीट, कासिगो रबाडा आणि रूडी सेकंड.
Last Updated : Oct 19, 2019, 11:25 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details