नवी दिल्ली - तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळण्यासाठी भारतात आलेल्या श्रीलंका संघाची सुरूवात चांगली झाली नाही. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्यांना ७ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. तिसरा आणि अखेरचा सामना पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याआधी श्रीलंकेला एक धक्का बसला आहे. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज इसुरू उडाना दुखापत झाली असून तो यामुळे तिसरा सामना खेळणार नाही.
इसुरू उडानाच्या दुखापतीविषयी श्रीलंकेचे प्रशिक्षक मिका आर्थर यांनी सांगितले की, 'भारत विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना उडानाला दुखापत झाली. यामुळे तो तिसरा सामना खेळू शकणार नाही.'
दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेच्या फलंदाजांनी खूप सारे चेंडू वाया घातले. त्या चेंडूवर त्यांनी एक-दोन धावा घ्यायला हव्या होत्या, असेही आर्थर यांनी सांगितलं.