महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

टी-२० मध्ये सलग १८ चेंडू निर्धाव; दीप्तीचा भन्नाट स्पेल, ४ षटके, ३ निर्धाव आणि ३ गडी बाद - deepti sharma latest

आफ्रिकेविरुध्दच्या सामन्यात फिरकी गोलंदाज दीप्तीने चार षटकाच्या गोलंदाजीत ८ धावा देत ३ गडी बाद केले. महत्वाची बाब म्हणजे, दीप्तीने चार षटकांपैकी ३ षटके निर्धाव टाकली आहेत. भारताकडून आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात ३ षटके निर्धाव टाकण्याचा विक्रम दीप्तीच्या नावे झाला आहे. दीप्तीने आपल्या स्पेलमध्ये पहिली धाव १९ व्या चेंडूवर दिली. याच कामगिरीमुळे दीप्तीला 'सामनावीर' म्हणून गौरवण्यात आले.

टी-२० मध्ये सलग १८ चेंडू निर्धाव; दीप्तीचा भन्नाट स्पेल, ४ षटके, ३ निर्धाव आणि ३ गडी बाद

By

Published : Sep 25, 2019, 7:53 PM IST

Updated : Sep 25, 2019, 8:44 PM IST

नवी दिल्ली - भारतीय महिला संघ आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघामध्ये मंगळवारी टी-२० क्रिकेट सामना रंगला होता. या सामन्यात भारतीय महिला संघाने आफ्रिकेच्या महिला संघावर ११ धावांनी रोमहर्षक विजय मिळवत ५ सामन्याच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. भारताच्या विजयात मोलाची भूमिका पार पाडली कर्णधार हरमनप्रित कौर आणि दीप्ती शर्मा यांनी. कौरने फलंदाजीत तर दीप्तीने गोलंदाजीत योगदान दिले.

दक्षिण आफ्रिकेची कर्णधार सुने ल्यूस हिने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर भारताकडून कर्णधार हरमनप्रित कौर (४३), स्मृती मानधना (२१) आणि रॉड्रिक्सच्या १९ धावांच्या जोरावर भारताने निर्धारीत २० षटकात ८ बाद १३० धावा केल्या आणि आफ्रिकेच्या संघासमोर १३१ धावांचे आव्हान ठेवले.

दीप्ती शर्मा गडी बाद केल्यानंतर आनंद व्यक्त करताना..

हेही वाचा -मराठमोळ्या 'स्मृती'चा विक्रम; विराट, रोहित, धोनीसारखे दिग्गजही करू शकले नाहीत 'असा' विक्रम

या धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेचा डाव गडगडला. दीप्ती शर्मा, पूनम यादव, राधा यादव आणि शिखा पांडे यांनी भेदक गोलंदाजी करत आफ्रिकेला ११९ धावांत गुंडाळले आणि सामना ११ धावांनी जिंकला.

दरम्यान, या सामन्यात फिरकी गोलंदाज दीप्तीने चार षटकाच्या गोलंदाजीत ८ धावा देत ३ गडी बाद केले. महत्वाची बाब म्हणजे, दीप्तीने चार षटकांपैकी ३ षटके निर्धाव टाकली आहेत. भारताकडून आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात ३ षटके निर्धाव टाकण्याचा विक्रम दीप्तीच्या नावे झाला आहे. दीप्तीने आपल्या स्पेलमध्ये पहिली धाव १९ व्या चेंडूवर दिली. याच कामगिरीमुळे दीप्तीला 'सामनावीर' म्हणून गौरवण्यात आले.

हेही वाचा -Bday Spl : पंचानी चेंडू वाईड न दिल्याने, सामना अर्ध्यावर सोडलेले 'बिशन सिंग बेदी'

Last Updated : Sep 25, 2019, 8:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details