महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

रोहित शर्माबद्दल चर्चा करणं बस्स करा - विराट कोहली - भारत विरुध्द दक्षिण आफ्रिका

पुण्यामध्ये पार पडलेल्या पत्रकार परिषदेत विराट म्हणाला की, 'कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच सलामीला येऊन रोहितने चांगली कामगिरी केली. सलामीला खेळताना त्याला त्याच्या पध्दताने खेळू द्यायला हवे. आत्ताच त्याच्या भविष्याबाबत चर्चा करणे उचित ठरणार नाही. यामुळे रोहितबद्दल पुढील चर्चा साऱ्यांनीच बंद करायला हवे. सध्या तो चांगल्या लयीत असून त्याला फक्त फलंदाजीचा आनंद घेऊ देणे गरजेचे आहे.'

रोहित शर्मा बद्दल चर्चा करणं बस्स करा - विराट कोहली

By

Published : Oct 9, 2019, 4:54 PM IST

पुणे- भारतीय कर्णधार विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी पत्रकारांशी वार्तालाप केला. विराटने या पत्रकार परिषदेत भारतीय संघाची सलामीवीर रोहित शर्माचे तोंडभरुन कौतुक केले आणि रोहित सलामीवीर म्हणून लयीत आहे. त्याला त्याच्या खेळाचा आनंद घेऊ देणे हाच सध्या आमचा हेतू असल्याचे सांगितले. विराटने रोहित शर्मा विषयावर जास्त लक्ष्य देऊ नये असा सल्लाही मीडियाला दिला.

पुण्यामध्ये पार पडलेल्या पत्रकार परिषदेत विराट म्हणाला की, 'कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच सलामीला येऊन रोहितने चांगली कामगिरी केली. सलामीला खेळताना त्याला त्याच्या पध्दताने खेळू द्यायला हवे. आत्ताच त्याच्या भविष्याबाबत चर्चा करणे उचित ठरणार नाही. यामुळे रोहित बद्दल पुढील चर्चा साऱ्यांनीच बंद करायला हवे. सध्या तो चांगल्या लयीत असून त्याला फक्त फलंदाजीचा आनंद घेऊ देणे गरजेचे आहे.'

आफ्रिकेविरुध्दच्या सामन्यात रोहितने कोणतेही दडपण न घेता खेळ केला. दुसऱ्या डावात तर त्याने झटपट खेळी करत मोठी धावसंख्या उभारण्यासाठी पाया रचला. त्याच्या या खेळीमुळे आमच्या गोलंदाजांना प्रतिस्पर्धी संघाला बाद करण्यासाठी अधिक वेळ मिळाला. रोहितला कसोटीत सलामीवीर म्हणून खेळवण्यास संघाला यापुढेही नक्कीच फायदा होईल. रोहित लयीत आहे, त्याच्या खेळीने तो संघाला मोठ्या धावसंख्या उभारुन देऊ शकतो, याची आम्हाला खात्री असल्याचेही विराटने सांगितले.

दरम्यान, रोहित शर्माने पहिल्यादांच कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला उतरत दोनही डावात शतकं केली. रोहितने पहिल्या डावात १७६ धावा केल्या तर दुसऱ्या डावात १२७ धावांची झटपट खेळी केली होती. त्याच्या या खेळींमुळे त्याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. आफ्रिकेविरुध्दचा दुसरा सामना पुण्याच्या गहुंजे मैदानावर १० ते १४ ऑक्टोबर दरम्यान रंगणार आहे.

हेही वाचा -'भारतीय गोलंदाज माझ्याकडून सल्ला घेतात, पण पाकचे खेळाडू घेत नाही'

हेही वाचा -सावधान इंडिया! गहुंजेची खेळपट्टी करू शकते घातपात, वाचा काय सांगतो इतिहास

ABOUT THE AUTHOR

...view details