महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

'मला 'त्या' घटनेतून चांगलाच धडा मिळाला'

पत्रकार परिषदेत विराट म्हणाला की, ' जेव्हा मी धोनीसोबतचा फोटो शेअर केला तेव्हा माझ्या मनात काही नव्हते. मी घरी निवांत होतो. तेव्हा माझ्या नजरेस तो फोटो पडला. तो फोटो मला इतका आवडला की लगेचच मी त्याला शेअर केले. या फोटोचा संबंध लोक धोनीच्या निवृत्तीशी जोडतील अशी पुसटशीही कल्पना मला नव्हती. अन्यथा मी त्या फोटोला अपलोड केलाच नसता. अस स्पष्टीकरण विराटनं दिलं आहे.

मला 'त्या' घटनेतून चांगलाच धडा मिळाला, अस का म्हणाला विराट कोहली वाचा

By

Published : Sep 14, 2019, 9:13 PM IST

नवी दिल्ली- भारतीय क्रिकेट कर्णधार विराट कोहलीने महेंद्रसिंह धोनीसोबतच्या एक फोटो ट्विट केला होता. या ट्विटचा संबंध नेटकऱ्यांनी थेट धोनीच्या निवृत्तीशी जोडला. तेव्हा चक्क निवड समिती प्रमुख एम.एस.के. प्रसाद यांना पुढे येऊन याचे स्पष्टीकरण द्यावे लागले. प्रसाद यांनी धोनीच्या निवृत्तीविषयीच्या बातम्या खोट्या असल्याचे सांगितले. प्रसाद यांच्या स्पष्टीकरणानंतर स्वतः कर्णधार विराट कोहलीनेही याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

भारतीय संघाविरुध्द टी-२० मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचाचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला आहे. या मालिकेच्या निमित्ताने आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत विराटने धोनीबाबत केलेल्या ट्विटवर स्पष्टीकरण दिले.

हेही वाचा -चुरशीचा सामना जिंकत टीम इंडियाने पटकावला 'आशिया चषक', मुंबईचा अथर्व ठरला हिरो

या पत्रकार परिषदेत विराट म्हणाला की, 'जेव्हा मी धोनीसोबतचा फोटो शेअर केला तेव्हा माझ्या मनात काही नव्हते. मी घरी निवांत होतो. तेव्हा माझ्या नजरेस तो फोटो पडला. तो फोटो मला इतका आवडला की लगेचच मी त्याला शेअर केले. या फोटोचा संबंध लोक धोनीच्या निवृत्तीशी जोडतील अशी पुसटशीही कल्पना मला नव्हती. अन्यथा मी त्या फोटोला अपलोड केलाच नसता. अस स्पष्टीकरण विराटनं दिलं आहे.

हेही वाचा -महेंद्रसिंह धोनी होणार निवृत्त... विराट कोहलीने दिले संकेत

या विषयी पुढे बोलताना विराट म्हणाला, मला या घटनेतून चांगलाच धडा मिळाला आहे. यापुढे मी विचार न करता कोणताही फोटो अपलोड करणार नाही. असही त्यानंस सांगितलं. दरम्यान, भारतीय संघ दक्षिण आफ्रिका संघाविरुध्द ३ टी-२० सामन्याची मालिका खेळणार आहे. या मालिकेला १५ सप्टेंबर पासून सुरूवात होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details