मोहाली- भारत विरुध्द दक्षिण आफ्रिका संघामध्ये ३ सामन्याची मालिका सुरू आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. आज दुसरा सामना मोहालीच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात पावसाची शक्यता कमी असल्याची अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
हेही वाचा -IND VS SA : भारतीय संघ मायदेशात पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत
टी-२० मालिकेतील पहिला सामना धर्मशाला येथे होणार होता. मात्र, तो सामना मुसळधार पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यानंतर आज मोहालीच्या मैदानावर विराट सेनेसमोर आफ्रिकेचे खेळाडू मैदानात उतरतील. तत्पूर्वी, या सामन्यात हवामानाची स्थिती काय असेल याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष आहे. हवामान खात्याने आज मोहालीमध्ये पावसाची शक्यता कमी असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
हेही वाचा -Cricket Records: कसोटीत चिवट फलंदाज स्टीव्ह स्मिथला 'शुन्या'वर बाद करणारे ४ गोलंदाज
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मोहालीमध्ये आज संध्याकाळी ३० अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान असेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे दुसरा टी-२० सामना पावसाच्या व्यत्ययाशिवाय रंगणार हे निश्चीत झाले आहे. दरम्यान, मोहालीचे मैदान फलंदाजांसाठी नंदनवन मानले जाते. यामुळे आजच्या सामन्यात धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच या सामन्यात भारतीय संघात नव्याने संधी मिळालेल्या खेळाडूंकडे विशेष लक्ष असणार आहे.