महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

वृद्धीमानने पकडले अफलातून झेल, नेटिझन्सनी पंतला दिला साहाकडून शिकण्याचा सल्ला - trolled on social media

आफ्रिकेविरुध्दच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात साहाने दोन अप्रतिम झेल घेतले. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या डावातही थ्युनिश डी ब्रायनचा जबरदस्त झेल घेतला होता. दुसऱ्या डावातही त्याने एक अफलातून झेल टिपला. आफ्रिकेचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजी करत असताना सहाव्या षटकात उमेश यादव गोलंदाजी करत होता. या षटकातील चौथ्या चेंडूवर थ्युनिश डी ब्रायन लेग साइडला चेंडू फ्लिक करण्याच्या तयारीत होता. मात्र, चेंडू बॅटची कड घेऊन मागे गेला. तेव्हा साहाने सूर मारून चेंडू एका हाताने झेलला.

वृद्धीमानने पकडले अफलातून झेल, नेटिझन्सनी पंतला दिला साहाकडून शिकण्याचा सल्ला

By

Published : Oct 13, 2019, 8:28 PM IST

पुणे - भारताने दक्षिण आफ्रिकेविरुध्दचा दुसरी कसोटी सामना १ डाव १३७ धावांनी जिंकत मालिकेत २-० ने आघाडी घेतली. या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीचे नाबाद द्विशतक आणि गोलंदाजांनी केलेली अप्रतिम कामगिरी याची चर्चा रंगली. मात्र, या मालिकेत ऋषभ पंतच्या ठिकाणी संघात संधी मिळालेल्या वृद्धीमान साहाने दोन अप्रतिम झेल घेत आपली छाप सोडली. सोशल मीडियावर सध्या साहाचाच बोलबाला होत असून नेटिझन्स पंतला साहाकडून काही तरी शिक असा सल्ला देत आहेत.

आफ्रिकेविरुध्दच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात साहाने दोन अप्रतिम झेल घेतले. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या डावातही थ्युनिश डी ब्रायनचा जबरदस्त झेल घेतला होता. दुसऱ्या डावातही त्याने एक अफलातून झेल टिपला. आफ्रिकेचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजी करत असताना सहाव्या षटकात उमेश यादव गोलंदाजी करत होता. या षटकातील चौथ्या चेंडूवर थ्युनिश डी ब्रायन लेग साइडला चेंडू फ्लिक करण्याच्या तयारीत होता. मात्र, चेंडू बॅटची कड घेऊन मागे गेला. तेव्हा साहाने सूर मारून चेंडू एका हाताने झेलला. पाहा व्हिडिओ...

साहाने अश्विनच्या गोलंदाजीवर आफ्रिकेचा कर्णधार ड्युप्लेसीचा झेल घेतला. घडलं असं की, अश्विनच्या गोलंदाजीवर ड्युप्लेसीचा सोपा झेल उडाला. मात्र, साहाला तो झेलताना मोठी कसरत करावी लागली. यात हातात आलेला चेंडू सुटल्यांनंतर त्याला दोन तीन वेळा झेलण्यासाठी प्रयत्न करावे लागले. अखेर त्याने सुर मारत कसाबसा तो झेल पकडला. पाहा व्हिडिओ...

दरम्यान, वेस्ट इंडीज दौऱ्यातील खराब कामगिरीमुळे ऋषभ पंतला डच्चू देत आफ्रिकेविरुध्दच्या मालिकेसाठी वृद्धीमान साहाला संघात स्थान देण्याचा निर्णय निवड समितीने घेतला. साहाला या मालिकेतील पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात फलंदाजीची संध मिळाली होती. त्यात त्याने २१ धावा काढल्या होत्या. मात्र, त्याने यष्टीरक्षणात आपली छाप सोडली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या खेळत असलेल्या यष्टीरक्षकांमध्ये साहा सर्वोत्कृष्ठ ठरला आहे. वेगवान गोलंदाजीवेळी झेल घेण्यात त्याने आघाडी घेतली आहे. यात त्याची अचुकता ९६.९ टक्के इतकी आहे.

हेही वाचा -टीम इंडियाने जिंकली पुणे कसोटी, आफ्रिकेवर १ डाव १३७ धावांनी मात

हेही वाचा -जागतिक कसोटी अजिंक्यपद: भारताचे अव्वलस्थान भक्कम तर पाकिस्तान तळाला

ABOUT THE AUTHOR

...view details