विशाखापट्टणम - भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला २०३ धावांनी धूळ चारली. भारताने या विजयासह जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेतील अव्वलस्थान अधिक बळकट केले. आफ्रिकेविरुध्दच्या या विजयात पाच खेळाडूंनी मोलाची भूमिका पार पाडली. पाहूयात कोण आहेत, ते पाच खेळाडू -
रोहित शर्मा -
पहिल्यांदाच भारतीय संघाचा सलामीवीर म्हणून मैदानात उतरलेल्या रोहित शर्माने आफ्रिकेविरुध्दच्या सामन्यात दोनही डावात शतकं झळकावली. त्याने पहिल्या डावात १७६ धावा झोडपल्या तर दुसऱ्या डावात आक्रमक १२७ धावा केल्या. त्याच्या या खेळींमुळेच त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
मयांक अग्रवाल -
आफ्रिकेविरुध्दच्या सामन्यात दुसरा सलामीर मयांक अग्रवालने पहिल्या डावात द्विशतक झळकावले. मयांकच्या या दमदार खेळीमुळेच भारतीय संघ पहिल्या डावात पाचशे पार धावा करु शकला.