महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 24, 2019, 11:30 PM IST

ETV Bharat / sports

मराठमोळ्या 'स्मृती'चा विक्रम; विराट, रोहित, धोनीसारखे दिग्गजही करू शकले नाहीत 'असा' विक्रम

भारत विरुध्द दक्षिण आफ्रिका महिला संघात ५ सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात स्मृती मानधनाने पाऊल ठेवताच टी-२० क्रिकेटमध्ये सलग ५० सामने खेळण्याचा विक्रम केला. मानधना पुरुष आणि महिला क्रिकेटरमध्ये असा पराक्रम करणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.

स्मृती मानधना

नवी दिल्ली - भारतीय महिला संघाची सलामीवीर फलंदाज मराठमोळी स्मृती मानधना हिने एक अनोखा विक्रम केला आहे. हा विक्रम विराट कोहली, रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनी यांच्यासह कोणत्याही भारतीय खेळाडूंना करता आलेला नाही. स्मृतीने टी-२० क्रिकेटमध्ये सलग ५० सामने खेळण्याचा विक्रम केला आहे.

हेही वाचा ःविराटला आली धोनीची आठवण, 'या'साठी रोहित शर्माकडे मागितली मदत

भारत विरुध्द दक्षिण आफ्रिका यांच्या महिला संघात ५ सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात स्मृती मानधनाने पाऊल ठेवताच 'हा' विक्रम प्रस्थापित केला. मानधना पुरुष आणि महिला क्रिकेटरमध्ये असा विक्रम करणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.


हेही वाचा ःपरदेशात 'हिरो' ठरलेला जसप्रीत बुमराह 'या'बाबतीत मायदेशात आहे 'झिरो'

दरम्यान, आफ्रिकेविरुध्दच्या पहिल्या सामन्यात मानधनाने १६ चेंडूत ४ चौकारच्या मदतीने २१ धावा केल्या. भारतीय संघाने या सामन्यात निर्धारीत २० षटकामध्ये ८ बाद १३० धावा करत आफ्रिकेसमोर १३१ धावांचे आव्हान ठेवले. आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ सर्वबाद ११९ धावा करू शकला आणि भारताने हा सामना ११ धावांनी जिंकला. स्मृती मानधनाने टी-२० क्रिकेटमध्ये ५९ सामने खेळली आहेत. यात त्याने २८.८८ च्या सरासरीने १३१९ धावा केल्या आहेत. मानधनाची सर्वोच्च धावसंख्या ८६ आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details