नवी दिल्ली - भारत विरुध्द दक्षिण आफ्रिका संघामध्ये उद्यापासून (बुधवार) कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. या मालिकेतून भारतीय प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहने दुखापतीमुळे माघार घेतली. बुमराहच्या गैरहजेरीत इतर गोलंदाजांची जबाबदारी वाढली असून याप्रकरणी भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
याविषयी सचिन म्हणतो की, 'दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत, कर्णधार विराट कोहलीला बुमराहची उणिव निश्चित भासेल यात शंका नाही. पण, तो दुखापतीमुळे संघा बाहेर आहे. त्याची उणिव भासू देणार नाहीत, असे पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. वेगवान गोलंदाजांसोबत फिरकी गोलंदाजही त्यांची भूमिका चांगल्या पध्दतीने बजावत आहेत.'