महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IND VS SA : मयांक अग्रवालने झळकावले द्विशतक

सामन्याच्या पहिल्या दिवशी मयांक ८४ धावांवर नाबाद होता. आज दुसऱ्या दिवशी त्याने आपले शतक पूर्ण केले. याच शतकाचे रूपांतर त्याने द्विशतकात करत त्याने जबरदस्त खेळी केली. मयांकने ३५८ चेंडूत द्विशतक साजरे केले. आपल्या पाचव्या कसोटी सामन्यातच त्याने ही कामगिरी केली आहे. यात २२ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश आहे. मयांक २१५ धावांवर बाद झाला.

IND VS SA : मयांक अग्रवालने झळकावले द्विशतक

By

Published : Oct 3, 2019, 2:10 PM IST

Updated : Oct 3, 2019, 4:09 PM IST

विशाखापट्टणम - भारताचा सलामीवीर फलंदाज मयांक अग्रवालने दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावले. विशाखापट्टण येथील के. राजशेखर रेड्डी मैदानावर सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत सामन्यात मयांकने कारकीर्दीमधील पहिले द्विशतक ठोकत २१५ धावा केल्या. आपल्या पाचव्याच कसोटी सामन्यात त्याने ही कामगिरी केली आहे. दरम्यान, आफ्रिकेविरुध्द द्विशतक ठोकणारा मयांक भारताचा दुसरा सलामीवीर खेळाडू ठरला आहे.

सामन्याच्या पहिल्या दिवशी मयांक ८४ धावांवर नाबाद होता. आज दुसऱ्या दिवशी त्याने आपले शतक पूर्ण केले. याच शतकाचे रूपांतर त्याने द्विशतकात करत त्याने जबरदस्त खेळी केली. मयांकने ३५८ चेंडूत द्विशतक साजरे केले. यात २२ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश आहे. मयांक २१५ धावांवर बाद झाला.

मयांकने २०१८ मध्ये 'बॉक्सिंग डे'निमित्त आयोजित कसोटी सामन्यातून ऑस्ट्रेलियाविरुध्द कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या सामन्यात त्याने ७६ धावांची खेळी केली होती.

आफ्रिकेविरुध्द द्विशतक ठोकणारा मयांक भारताचा दुसरा सलामीवीर खेळाडू ठरला आहे. यापूर्वी २००८ मध्ये भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने द्विशतक केले होते. भारतीय सलामीवीरानं कसोटीत द्विशतक झळकावण्याची ही पाचवी वेळ असून आजच्या खेळीतनंतर मयांक या यादीत पाचव्या स्थानावर विराजमान झाला आहे.

विरेंद्र सेहवागने २००९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध २९३, गौतम गंभीरने २००८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०६, सेहवागने २००८ मध्ये श्रीलंकेविरुद्ध नाबाद २०१ आणि सेहवागने २००८ मध्ये आफ्रिकेविरुद्ध ३१९ धावा केल्या आहेत. आज मयांकने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २१५ धावा करत या यादीत स्थान मिळवले आहे.

हेही वाचा -IND VS SA : रोहित-मयांकची जोडी जमली रे.., सेहवाग-गंभीरचा १५ वर्षांपूर्वीचा मोडला विक्रम

हेही वाचा -कसोटी : सलामीवीर म्हणून शतकी ठोकणारा रोहित चौथा; १, २, ३ कोण आहेत वाचा...

Last Updated : Oct 3, 2019, 4:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details