बंगळुरु- भारत आणि दक्षिण आफ्रिका संघामध्ये ३ सामन्याची टी-२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील अखेरचा तिसरा सामना चिन्नास्वामी स्टेडियमवर रविवारी होत आहे. मात्र, या लढतीवर पावसाचे सावट निर्माण झाले आहे.
भारत विरुध्द आफ्रिका संघामध्ये सुरू असलेल्या मालिकेतील धर्मशाला येथे होणारा पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने आफ्रिकेवर ७ गडी राखून विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. अखेरचा सामना रविवारी होती असून या सामन्यावर पावसाचे सावट आहे.
दरम्यान, अखेरच्या या सामन्यात भारतीय संघ सलग दुसऱ्या विजय मिळवून मालिका जिंकण्याचा निर्धाराने मैदानात उतरेल. तर आफ्रिका विजय मिळवून मालिका बरोबरीच सोडण्याच्या प्रयत्न करेल. यासाठी आफ्रिकेला कामगिरी उंचावण्याचे आव्हान असेल.
दुसऱ्या सामन्यात आफ्रिकेला भारतीय गोलंदाजांनी १४९ धावांवर रोखले. त्यानंतर कर्णधार कोहलीने नाबाद ७२ धावांची शानदार खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. भारतीय संघ सर्व आघाडीत फुल्ल फॉर्मात आहे. यामुळे आफ्रिकेवरील दडपण वाढले आहे.