महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

'लव्ह यू ऋषभ...!' तरुणीच्या 'दिल की बात'वर पंतने काय केले वाचा... - ऋषभ पंत विषयी बातमी

पंत संघासह चिन्नस्वामी मैदानात सरावासाठी आला होता. पंतला पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. सरावानंतर पंत आपल्या चाहत्यांना स्वाक्षरी देत होता. तेव्हा एक तरुणी 'लव्ह यू ऋषभ', असे जोरात ओरडली. हे ऐकून पंत लाजला. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल झाला आहे.

'लव्ह यू ऋषभ...!' तरुणीच्या 'दिल की बात'वर पंतने काय केले वाचा...

By

Published : Sep 24, 2019, 6:10 PM IST

नवी दिल्ली - भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत याला मागील काही सामन्यात अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. यामुळे त्याचे टीम इंडियातील स्थान डगमळीत बनले आहे. मात्र, चाहत्यांमध्ये त्याची 'क्रेझ' कमी झालेली नाही. याचा प्रत्यय दक्षिण आफ्रिका विरुध्दच्या अखेरच्या टी-२० सामन्या दरम्यान आला.

हेही वाचा -सुपर ओव्हरच्या नियमात बदल...असा ठरणार विजेता

बंगळुरूच्या चिन्नस्वामी मैदानात भारत विरुध्द आफ्रिका संघामधील टी-२० मालिकेतील अखेरचा सामना पार पडला. या सामन्यात आफ्रिकेने कर्णधार क्विंटन डी कॉकच्या नाबाद ७९ धावांच्या जोरावर भारतावर ९ गडी राखून विजय मिळवला आणि मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. या सामन्यात ऋषभ पंतने अवघ्या १९ धावा काढल्या.

या सामन्यापूर्वी पंत संघासह चिन्नस्वामी मैदानात सरावासाठी आला होता. पंतला पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. सरावानंतर पंत आपल्या चाहत्यांना स्वाक्षरी देत होता. तेव्हा एक तरुणी 'लव्ह यू ऋषभ' असे जोरात ओरडली. हे ऐकून पंत लाजला. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल झाला आहे.

हेही वाचा -जेव्हा धोनीने जिंकला होता पहिला विश्वचषक आणि सोबतच.. लोकांचा विश्वास

दरम्यान, पंत सध्या ऑऊट ऑफ फॉर्म आहे. वेस्ट इंडीज विरुध्दची ६५ धावांची खेळी वगळता पंतला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. धोनीच्या जागेवर पंतला यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून पाहिले जात आहे. मात्र, तो सतत फलंदाजीमध्ये अपयशी ठरताना दिसत आहे. असे असले तरी त्याची क्रेझ चाहत्यांमध्ये दिसून येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details