महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IND VS SA : भारतीय क्रिकेट संघाची सुरक्षा रामभरोसे, कारण.. - Chandigarh police

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ मोहाली विमानतळावर दाखल होताच मोहाली पोलिसांनी त्यांना सुरक्षा पुरवली. त्यानंतर चंदिगडची पोलिसांची हद्द सुरू होताच मोहाली पोलीस माघारी परतले. बीसीसीआयने सुरक्षा पुरवण्यासाठीची रक्कमच जमा न केल्याने चंदिगड पोलिसांनी संघांना सुरक्षा पुरवण्यास नकार दिला आहे.

भारतीय संघ

By

Published : Sep 17, 2019, 4:32 PM IST

Updated : Sep 17, 2019, 4:58 PM IST

चंदिगड- भारत आणि दक्षिण आफ्रिका या संघांमध्ये ३ सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना बुधवारी चंदिगड येथे होणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वी खेळाडूंना सुरक्षा पुरवण्यात चंदिगड पोलिसांनी नकार दिला आहे.

हेही वाचा -यंदाच्या अ‌ॅशेस मालिकेतील स्मिथचे हे विक्रम पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) खेळाडूंच्या सुरक्षेसाठी देण्यात येणारी ९ कोटी रक्कम अद्याप दिलेली नाही. यामुळे पोलिसांनी हा पावित्रा घेतला आहे. सध्या टीम इंडियाची सुरक्षा पोलिसांअभावी 'रामभरोसे' आहे.

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ मोहाली विमानतळावर दाखल होताच मोहाली पोलिसांनी त्यांना सुरक्षा पुरवली. त्यानंतर चंदिगडच्या पोलिसांची हद्द सुरू होताच मोहाली पोलीस माघारी परतले. बीसीसीआयने सुरक्षा पुरवण्यासाठीची रक्कमच जमा न केल्याने चंदिगड पोलिसांनी संघांना सुरक्षा पुरवण्यास नकार दिला आहे.

हेही वाचा -८६७ षटकानंतर फेकला पहिला 'नो बॉल', अन्...वाचा कोण आहे कमनशिबी गोलंदाज

दरम्यान, खासगी सुरक्षारक्षकांच्या देखरेखीखाली दोन्ही संघ हॉटेलमध्ये सुरक्षित पोहोचले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुध्दचा पहिला टी-२० सामना पावसाअभावी रद्द करण्यात आला. त्यानंतर आता दुसरा कसोटी सामना मोहाली येथे बुधवारी खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. मात्र, धर्मशाला प्रमाणेच मोहालीतही पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

भारतीय संघ -
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, खलील अहमद, दीपक चहर आणि नवदीन सैनी.

दक्षिण आफ्रिकेचा संघ -
क्विंटन डि कॉक (कर्णधार), रॉसी व्हॅन डेर डुसेन, तेंबा बावुमा, ज्युनिअर डाला, ब्योर्न फोर्चुन, बुरान हेंड्रीक्स, रीजा हेंड्रीक्स, डेव्हिड मिलर, एनरिच नोर्जे, अँडिले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरीयस, कागिसो रबाडा, तरबेझ शम्सी आणि जॅन जान स्मट्स.

Last Updated : Sep 17, 2019, 4:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details