धर्मशाळा- भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना धर्मशाळा येथे खेळवण्यात येणार होता. पण हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. दुपारी १.३० वाजता या सामन्याला सुरुवात होणार होती, पण नाणेफेक आधीच पावसाने हजेरी लावली, यामुळे नाणेफेक झाली नाही. यानंतर जर ६.३० च्या आधी पाऊस थांबला आणि खेळासाठी पोषक वातावरण निर्माण झाले. तर २०-२० षटकांचा सामना खेळता येऊ शकतो. अन्यथा हा सामना रद्द केला जाईल, असे बीसीसीआयने सांगितलं होते. पण पावसाचा जोर कायम राहिल्याने अखेरीस साडेपाचच्या सुमारास हा सामना रद्द झाल्याची घोषणा बीसीसीआयने केली. दरम्यान, आता मालिकेतील दुसरा सामना १५ मार्चला लखनऊमध्ये होणार आहे.
IND vs SA : पहिला एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय सामना
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना धर्मशाळा येथे खेळवण्यात येणार होता. पण हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे.
IND vs SA : पहिला एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द
असा आहे भारतीय संघ -
- विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, नवदीप सैनी आणि कुलदीप यादव.
असा आहे दक्षिण आफ्रिकेचा संघ -
- क्विंटन डिकॉक (कर्णधार), तेम्बा बावुमा, रेसी वान डेर डुसेन, फाफ डुप्लेसिस, कोली वेरीने, हेन्रिक क्लासेन, जेनमॅन मलान, डेव्हिड मिलर, जॉन-जॉन स्मट्स, एन्डिले फेहलुकवायो, लुंगी एनगिडी, लूथो सिपामला, एन्रिक नोर्टजे, ब्युरोन हेंड्रिक्स, जॉर्ज लिंडे आणि केशव महाराज.
Last Updated : Mar 12, 2020, 5:49 PM IST