ऑकलॅड : भारत-न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला उद्यापासून (शुक्रवार ता.२४) सुरुवात होणार आहे. भारतीय संघ या मालिकेसाठी न्यूझीलंडमध्ये दोन दिवसाआधी दाखल झाला आहे. पहिल्या सामन्याआधी दोनही संघाच्या कर्णधारांनी 'चषका'सह फोटो सेशन केले. याचे फोटो बीसीसीआयने ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
बीसीसीआयने शेअर केलेल्या फोटोमध्ये भारतीय कर्णधार विराट कोहली आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन 'चषका'सह दिसून येत आहेत. बीसीसीआयने या फोटोसह खेळाडूंचा एक फोटोही शेअर केला आहेत. त्यात भारतीय संघातील खेळाडू सरावादरम्यान, मैदानात घाम गाळल्यानंतर हास्यविनोदात दंग असताना पाहायला मिळत आहेत.
दरम्यान, भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनला दुखापत झाल्याने, त्याला टी-२० आणि एकदिवसीय मालिकेतून माघार घ्यावी लागली. तेव्हा बीसीसीआयने शिखरच्या जागेवर, संजू सॅमसनला टी-२० संघात संधी दिली. तर एकदिवसीय मालिकेत शिखरच्या जागेवर पृथ्वी शॉची निवड करण्यात आली आहे.