महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IND vs NZ : टीम इंडियासाठी धोकादायक ठरु शकतात, न्यूझीलंडचे 'हे' खेळाडू - भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-२० मालिका

भारत-न्यूझीलंड यांच्यात कडवी झुंज क्रिकेट चाहत्यांना पाहता येणार आहे. दरम्यान, न्यूझीलंड दौरा सुरू होण्याआधी आम्ही तुम्हाला किवीचे धोकादायक खेळाडूविषयी माहिती देणार आहोत. जे टीम इंडियाच्या विजयात अडचणी निर्माण करु शकतात. वाचा कोण आहेत ते खेळाडू...

Ind vs nz t20 series : team india should be alert from these five players of new zealand
IND vs NZ : टीम इंडियासाठी धोकादायक ठरु शकतात, न्यूझीलंडचे 'हे' खेळाडू

By

Published : Jan 21, 2020, 9:48 AM IST

हैदराबाद- भारतीय संघाने तुल्यबळ ऑस्ट्रेलिया संघाचा ३ सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत २-१ ने पराभव केला. भारतीय संघ यानंतर न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. २४ जानेवारीपासून सुरू होणारा न्यूझीलंड दौरा भारतीय संघासाठी सोपा नाही. कारण, न्यूझीलंडचा संघ मायदेशात नेहमीच चांगली कामगिरी करताना दिसतो. यामुळे भारत-न्यूझीलंड यांच्यात कडवी झुंज क्रिकेट चाहत्यांना पाहता येणार आहे. दरम्यान, न्यूझीलंड दौरा सुरू होण्याआधी आम्ही तुम्हाला किवीचे धोकादायक खेळाडूविषयी माहिती देणार आहोत. जे टीम इंडियाच्या विजयात अडचणी निर्माण करु शकतात. वाचा कोण आहेत ते खेळाडू...

केन विल्यमसन -
'कूल' कर्णधार केन विल्यमसनवर न्यूझीलंडचा भार आहे. तो संपूर्ण लयीत असून तो सातत्याने धावा करत आहे. भारतीय संघाला याच्याविरुद्ध खास रणणिती आखाण्याची गरज आहे.

केन विल्यमसन

मार्टिन गुप्टील -
न्यूझीलंडचा सलामी फलंदाज मार्टिन गुप्टील जगात धडाकेबाज फलंदाज म्हणून ओळखला जातो. भारतीय गोलंदाजांना याला पावर प्ले मध्ये बाद करण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण गुप्टीलचा जम बसला की, तो सामन्याचे चित्रच पालटून टाकू शकतो.

मार्टिन गुप्टील

टिम साऊदी -
टीम साऊदी न्यूझीलंडचा अनुभवी गोलंदाज असून मायदेशात खेळताना त्याची कामगिरी नेहमीच उंचावते. भारतीय फलंदाजांना याच्याविरुद्ध खेळताना तंत्रशुध्द फलंदाजी करावी लागणार आहे. साऊदी आपल्या स्विंग आणि वेगाच्या जोरावर भारताच्या सर्वोत्तम फलंदाजालाही अडचणीत आणू शकतो.

टिम साऊदी

कॉलिन मुन्रो -
न्यूझीलंडचा स्फोटक सलामीवीर कॉलिन मुन्रोपासूनही भारताला सावध रहावं लागेल. तो संघाला स्फोटक सुरूवात करुन देण्यात माहिर आहे. भारतीय गोलंदाजाला याला लवकर बाद करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. मुन्रोने टी-२० क्रिकेटमध्ये ४ शतकं केली असून त्याचा स्ट्राईक रेट १४५ इतका आहे.

कॉलिन मुन्रो

कॉलिन डी ग्रँडहोम -
अष्टपैलू कॉलिन मोक्याच्या क्षणी फलंदाजी असो की गोलंदाजी त्यात तो सरस कामगिरी करुन दाखवतो. यामुळे कॉलिनही भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरु शकतो.

कॉलिन डी ग्रँडहोम

ABOUT THE AUTHOR

...view details