बंगळुरु - भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली. या विजयानंतर आता भारतीय संघ २०२० या वर्षातील आपल्या पहिल्या परदेश दौऱ्यासाठी सोमवारी रात्री न्यूझीलंडला रवाना झाला आहे. भारतीय संघ या दौऱ्यात ५ टी-२०, ३ एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने न्यूझीलंडला रवाना होण्याआधी एअरपोर्टवरील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्या फोटोला त्याने 'नेक्स्ट स्टॉप ऑकलंड' असे कॅप्शन दिले आहे.
न्यूझीलंड दौऱ्यातील टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा याआधीच करण्यात आली आहे. तर अद्याप एकदिवसीय आणि कसोटी संघाची घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, याची घोषणा आज होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भारतीय संघातील खेळाडू दोन बॅचमध्ये न्यूझीलंडसाठी रवाना होणार आहेत. पहिल्या बॅचमधील खेळाडू सोमवारी रात्री न्यूझीलंडसाठी रवाना झाले आहेत.
असा आहे टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ -
- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, रविंद्र जाडेजा व शार्दुल ठाकूर.
असा आहे टी-२० मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ -
- केन विलियम्सन ( कर्णधार), हामिश बेन्नेट, टॉम ब्रूस ( ४-५ सामन्यासाठी), कॉलिन डी ग्रँडहोम (पहिल्या तीन सामन्यांसाठी), मार्टिन गुप्तील, स्कॉट कुग्गेलेन, डॅरील मिचेल, कॉलीन मुन्रो, रॉस टेलर, ब्लेअर टिकनर, मिचेल सँटनर, टीम सेईफर्ट ( यष्टिरक्षक), इश सोढी, टीम साऊदी.
भारत-न्यूझीलंड टी-२० मालिकेचे वेळापत्रक -
- पहिली टी-२० : ऑकलंड- २४ जानेवारी २०२०
- दुसरी टी-२०: ऑकलंड- २६ जानेवारी २०२०
- तिसरी टी-२०: हॅमिल्टन- २९ जानेवारी २०२०
- चौथी टी-२०: वेलिंग्टन- ३१ जानेवारी २०२०
- पाचवी टी-२०: माऊंट माउंगानुई- ०२ फेब्रुवारी २०२०