माउंट माउंगानुई -भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना माउंट माउंगानुईच्या बे-ओवल मैदानात खेळला जात आहे. भारतीय संघाने मालिका आधीच २-० ने गमावली असून किमान शेवटचा सामना जिंकून व्हाईटवॉश टाळण्याच्या उद्देश भारतीय संघाचा आहे. न्यूझीलंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली. तेव्हा भारताने प्रथम फलंदाजी केली. या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली पुन्हा फ्लॉप ठरला. तो अवघ्या ९ धावांवर बाद झाला. विशेष बाब म्हणजे ३ एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत एकही शतक न झळकावण्याची विराटची ही पहिलीच वेळ आहे.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली. तेव्हा प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरूवात खराब झाली. सलामीवीर मयांक अगरवाल (१) आणि विराट कोहली (९) स्वस्तात माघारी परतले. तेव्हा पृथ्वी शॉने श्रेयस अय्यरसह काही काळ डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु श्रेयस अय्यरसोबत चुकलेल्या ताळमेळने त्याची विकेट पडली. त्यानंतर मधल्या फळीतील श्रेयस अय्यर आणि केएल राहुल या जोडीने भारताचा डाव सावरला. राहुलचे शतक (११२) आणि त्याला श्रेयस अय्यरने (६२) अर्धशतकी खेळी करत दिलेल्या भक्कम साथीच्या जोरावर भारताने भारताने ५० षटकात ७ बाद २९६ धावा केल्या.