माउंट माउनगुई - भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना उद्या (मंगळवार) माउंट माउनगुईच्या मैदानात खेळला जाणार आहे. भारताने यापूर्वीच ही मालिका ०-२ अशी गमावली असली, तरी अखेरचा सामना जिंकून प्रतिष्ठा राखण्यासाठी भारताचा संघ उत्सूक असेल. दुसरीकडे टी-२० मालिकेच्या व्हाईटवॉशची परतफेड न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेत करू इच्छित आहे. यामुळे हा सामना रोमांचक होईल, अशी आपेक्षा आहे. दरम्यान, भारतीय संघासाठी माउंट माउनगुईचे मैदानात 'लकी' आहे.
असा आहे भारताचा माउंट माउनगुई मैदानावरील रेकॉर्ड -
भारताने आतापर्यंत माउंट माउनगुई मैदानात २ सामने खेळले आहेत. भारताने या दोनही सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला आहे. उभय संघात याआधी २८ जानेवारी २०१९ मध्ये सामना झाला होता. या सामन्यात भारताने ७ गडी राखून विजय मिळवला होता.
भारत-न्यूझीलंड यांच्यातील ३ सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना हॅमिल्टनमध्ये खेळवण्यात आला. न्यूझीलंडने हा सामना ४ गडी राखून जिंकला. त्यानंतर दुसरा सामना ऑकलंडमध्ये झाला. या सामन्यात भारतीय संघ २२ धावांनी पराभूत झाला.