महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IND vs ENG ४th T-२०: पराभवानंतर इंग्लंड संघाला आणखी एक धक्का - भारत वि. इंग्लंड चौथा टी-२० सामना न्यूज

चौथ्या सामन्यात षटकांची गती संथ ठेवल्यामुळे इंग्लंडला मॅच फीमधील २० टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे.

Ind vs Eng: Visitors fined 20 per cent match fees for slow over-rate in 4th T20I
IND vs ENG ४th T-२०: पराभवानंतर इंग्लंड संघाला आणखी एक धक्का

By

Published : Mar 20, 2021, 3:34 PM IST

अहमदाबाद - चौथ्या सामन्यातील पराभवानंतर इंग्लंड संघाला आणखी एक धक्का बसला. चौथ्या सामन्यात षटकांची गती संथ ठेवल्यामुळे इंग्लंडला मॅच फीमधील २० टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे.

आयसीसीच्या एलिट पॅनलमधील मॅच रेफरी जवागल श्रीनाथ यांनी ही कारवाई केली. इयॉन मॉर्गनच्या संघाने निर्धारीत वेळेत एक षटक कमी फेकले. त्यामुळे आयसीसीच्या कलम २.२२ नुसार त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. यात त्यांना २० टक्के दंड भरावा लागणार आहे. मॉर्गनने आपली चूक मान्य केली आहे.

दरम्यान, भारताला पहिल्या सामन्यात पराभव पत्कारावा लागला. भारताने याची परतफेड दुसऱ्या सामन्यात विजय मिळवत केली. तिसरा सामना इंग्लंडने जिंकत मालिकेत आघाडी घेतली. तेव्हा चौथ्या सामन्यात दडपणाच्या स्थितीत भारताने इंग्लंडवर सरशी साधत मालिका २-२ बरोबरीत आणली. आज उभय संघात नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पाचवा आणि निर्णायक टी-२० सामना खेळला जाणार आहे.

हेही वाचा -Ind vs Eng ५th T२० : भारत-इंग्लंड यांच्यात आज निर्णायक मुकाबला

हेही वाचा -Ind vs Eng ४th t-२० : भारताची मालिकेत बरोबरी; इंग्लंडवर मिळवला निसटता विजय

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details