चेन्नई - भारताविरुद्धच्या चेन्नई येथील पहिल्या कसोटी सामन्यात, दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा कर्णधार जो रुट याने द्विशतकी खेळी केली. रूटच्या या विक्रमी द्विशतकी खेळीनंतर बीसीसीआयने त्याचे अभिनंदन केले आहे.
दुसऱ्या दिवशी जो रुटने १४३ व्या षटकात रविचंद्रन अश्विनच्या चेंडूवर षटकार मारत द्विशतक पूर्ण केले. विशेष म्हणजे १०० वा कसोटी सामना खेळताना द्विशतक करणारा रुट पहिला फलंदाज बनला आहे. हे त्याच्या कारकिर्दीतील पाचवे द्विशतक ठरले.
जो रुटने द्विशतक पूर्ण केल्यानंतर बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन एक ट्विट केले. यात बीसीसीआयने रुटचे अभिनंदन केले आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने आपल्या १०० व्या कसोटीत झळकावलेल्या द्विशतकासाठी अभिनंदन, असे बीसीसीआयने म्हटलं आहे.