महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

चेन्नईतील पराभव : भारताचं टेन्शन वाढलं; WTCचा अंतिम सामना खेळण्यासाठी करावं लागेल 'हे' काम - भारत वि. इंग्लंड कसोटी मालिका न्यूज

न्यूझीलंड संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. तर दुसरा संघ म्हणून भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांना संधी आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिका निकालावर दुसरा संघ ठरणार आहे.

ind vs eng qualification scenarios for the world test championship 2021 finals
चेन्नईतील पराभव : भारतीय संघाचे टेन्शन वाढले; WTCचा अंतिम सामना खेळण्याची करावं लागेल 'हे' काम

By

Published : Feb 9, 2021, 8:41 PM IST

Updated : Feb 10, 2021, 6:17 AM IST

दुबई - भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाहिल्या कसोटी सामन्यानंतर, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत मोठा फेरबदल झाला. चेन्नई कसोटी २२७ धावांनी जिंकल्यानंतर इंग्लंडचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. तर भारतीय संघ पराभवानंतर चौथ्या स्थानी घसरला आहे. दुसऱ्या स्थानावर न्यूझीलंड संघ आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. दरम्यान, न्यूझीलंड संघाने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. तर दुसरा संघ म्हणून भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांना संधी आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिका निकालावर दुसरा संघ ठरणार आहे.

भारतीय संघाला अंतिम सामन्यात खेळण्यासाठी काय करावं लागेल...

भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळावयाचा असेल, तर भारताला इंग्लंडविरुद्धच्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेत २-१ किंवा ३-१ ने विजय मिळवला लागेल. याचाच अर्थ असा की, भारतीय संघाला पुढील तीन सामन्यात, दोन किंवा तीनही सामन्यात कोणताही परिस्थितीत विजय मिळवावा लागेल.

इंग्लंडसाठी असे आहे समीकरण...

इंग्लंडचा संघ जरी गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचलेला असला तरी, त्यांना भारताविरुद्धची मालिका ३-०, ३-१ किंवा ४-० अशा फरकाने जिंकावी लागेल. इंग्लंडला राहिलेल्या तीन सामन्यात कमीत कमी दोन विजय आणि तीनही सामने जिंकावी लागतील.

ऑस्ट्रेलियाचे भवितव्य या समीकरणावर...

ऑस्ट्रेलियाला देखील अंतिम सामना खेळण्याची संधी आहे. इंग्लंड संघाने भारतीय संघाला सुरू असलेल्या मालिकेत १-०, २-० किंवा २-१ ने पराभूत केले तर ऑस्ट्रेलिया संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल. याशिवाय भारत-इंग्लंड यांच्यातील अनिर्णीत राहिली तरी ऑस्ट्रेलिया थेट अंतिम फेरीत पोहोचेल. इंग्लंड संघाने राहिलेले तीनही सामने अनिर्णीत राखले किंवा यातील एक सामना जिंकला. तर ऑस्ट्रेलियाचा संघ न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामना खेळेल. इंग्लंड आणि भारताने राहिलेल्या तीन सामन्यात प्रत्येकी १-१ सामना जिंकला आणि राहिलेला एक सामना अनिर्णीत राहिला तरी ऑस्ट्रेलियाला अंतिम सामन्याचे तिकीट मिळेल.

Last Updated : Feb 10, 2021, 6:17 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details