पुणे - इंग्लंडविरुद्धची कसोटी आणि टी-२० मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाची नजर आता एकदिवसीय मालिकेवर आहे. उभय संघात उद्यापासून (ता.२३) तीन सामन्याची एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे. भारतीय संघाचे विजय रथ रोखण्याचे आव्हान इंग्लंड संघासमोर आहे. या मालिकेआधी आम्ही तुम्हाला अशा तीन फलंदाजांविषयी सांगणार आहोत, ज्यांनी इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा केल्या आहेत. वाचा कोण आहेत ते खेळाडू...
महेंद्रसिंह धोनी -
एकदिवसीय क्रिकेटमध्ये, इंग्लंडविरुद्ध भारताकडून सर्वाधिक धावा महेंद्रसिंह धोनीने केल्या आहेत. त्याने ४८ सामन्यात खेळताना ४६.८४ च्या सरासरीने १ हजार ५४६ धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि १० अर्धशतकांचा समावेश आहे. धोनीची इंग्लंडविरुद्ध सर्वोच्च धावसंख्या १३४ ही आहे.
युवराज सिंह -
युवराज सिंह या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. युवराजने मधल्या फळीत खेळताना ३७ सामन्यात १ हजार ५२३ धावा केल्या आहेत. यात ४ शतक आणि ७ अर्धशतकांचा समावेश आहे. युवराज इंग्लंडविरोधात सर्वाधिक शतक ठोकणारा फलंदाज आहे. विराटला युवराजच्या या विक्रमाशी बरोबरी साधण्यासाठी एका शतकाची गरज आहे.
सचिन तेंडुलकर -
भारताचा मास्टर ब्लास्टर खेळाडू सचिन तेंडुलकर या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध ३७ सामने खेळली आहेत. यात त्याने ४४.०९ च्या सरासरीने १ हजार ४५५ धावा केल्या आहेत. दोन शतक आणि दहा अर्धशतकांचा यात समावेश आहे. इंग्लंडविरुद्ध सचिनची सर्वोच्च धावसंख्या १२० आहे.
हेही वाचा -जोफ्रा आर्चर IPL मधून बाहेर पडल्यास.., 'या' ३ गोलंदाजांवर असेल राजस्थानची नजर
हेही वाचा -Ind vs Eng ODI Series : भारत-इंग्लंड १०० वेळा आमनेसामने, कोण ठरलं वरचढ