महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IND VS ENG : हार्दिक म्हणतोय.. तयारी झाली आहे, मैदानावर जाण्यासाठी वाट पाहू शकत नाही - hardik pandya net practice Video

हार्दिक पांड्याने त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन सराव करताना व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत हार्दिक गोलंदाजांने फेकलेले चेंडू मैदानाच्या चौफेर टोलावताना पाहायला मिळत आहे. व्हिडिओच्या शेवटी तो गोलंदाजी करताना देखील पाहायला मिळाला.

ind vs eng indian allrounder hardik pandya started net-practice-in-ahmedabad-ahead-of-t20-series
IND VS ENG : हार्दिक म्हणतोय... तयारी झाली आहे, मैदानावर जाण्यासाठी वाट पाहू शकत नाही

By

Published : Mar 10, 2021, 6:39 PM IST

मुंबई - भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० मालिकेला १२ मार्चपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेसाठी मर्यादित षटकांच्या सामन्यातील धडाकेबाज फलंदाज अशी ओळख असलेला भारताचा स्फोटक अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सज्ज झाला आहे.

हार्दिक पांड्याने त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन सराव करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत हार्दिक, गोलंदाजांने फेकलेले चेंडू मैदानाच्या चौफेर टोलावताना पाहायला मिळत आहे. व्हिडिओच्या शेवटी तो गोलंदाजी करताना देखील पाहायला मिळाला. तयारी झाली आहे. आता १२ मार्च रोजी मैदानावर जाण्यासाठी वाट पाहू शकत नाही, असे कॅप्शन हार्दिकने व्हिडिओ शेअर करताना दिलं आहे.

दरम्यान, हार्दिकने ऑस्ट्रेलियाविरोधातील मर्यादित षटकांच्या मालिकेत जबरदस्त कामगिरी नोंदवली होती. त्याने भारतीय संघाला टी-२० मालिकेत विजय मिळवून दिला होता. त्यानंतर हार्दिकने कोणताही सामना खेळलेला नाही.

भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ सामन्याची टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहे. हे पाचही सामने अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत. १२, १४, १६, १८ आणि २० मार्चला हे सामने होतील. भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७ वाजल्यापासून सामन्यांचे प्रक्षेपण सुरू होईल.

  • भारतीय संघ -
  • विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर.
  • इंग्लंडचा संघ -
  • इयॉन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, सॅम बिलींग, जोस बटलर, सॅम कुरन, टॉम कुरन, ख्रिस जॉर्डन, लाएम प्लंकेट, डेवीड मलान, आदिल रशीद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रिसे टॉप्ली, मार्क वूड, जॅक बॉल आणि मॅट पर्किसन.

हेही वाचा -टी-२० रॅकिंगमध्ये टीम इंडियाची उडी; ICC ने जारी केली ताजी क्रमवारी

हेही वाचा -Ind Vs Eng : भारतीय संघाला झटका, वरुण चक्रवर्ती फिटनेस चाचणीत नापास

ABOUT THE AUTHOR

...view details