महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IND vs ENG: इंग्लंडच्या अडचणीत वाढ, मॉर्गन दुखापतीमुळे उर्वरित मालिकेतून बाहेर - इयॉन मॉर्गन भारताविरुद्धच्या मालिकेतून बाहेर

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान, इयॉन मॉर्गनला दुखापत झाली. क्षेत्ररक्षण करताना त्याच्या हाताच्या अंगठ्यासह बोटे दुखावली गेली आहेत. यामुळे तो उर्वरित मालिकेत खेळाडू शकणार नाही. मॉर्गनच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व जोस बटलर करणार आहे.

ind-vs-eng-eoin-morgan-to-miss-odi-series
IND vs ENG: इंग्लंडचा संघ अडचणीत, मॉर्गन दुखापतीमुळे उर्वरित मालिकेतून बाहेर

By

Published : Mar 25, 2021, 9:49 PM IST

पुणे - एकदिवसीय मालिकेत पिछाडीवर असलेल्या इंग्लंड संघाला आणखी एक धक्का बसला आहे. इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन दुखापतीमुळे उर्वरित मालिका खेळणार नाही.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान, इयॉन मॉर्गनला दुखापत झाली. क्षेत्ररक्षण करताना त्याच्या हाताच्या अंगठ्यासह बोटे दुखावली गेली आहेत. यामुळे तो उर्वरित मालिकेत खेळाडू शकणार नाही. मॉर्गनच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व जोस बटलर करणार आहे.

आज मॉर्गन सराव सत्रात उतरला होता. यात दुखापतीमुळे त्याला सराव करताना त्रास होत होता. त्यामुळे त्याने आपण फिट नसल्याचे सांगितले.

उभय संघातील सामन्यादरम्यान, मॉर्गनसह सॅम बिलिंग्ज याला देखील दुखापत झाली. बिलिंग्जला सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली. यामुळे तो दुसरा सामना खेळणार नाही. परंतु तिसऱ्या सामन्यासंदर्भात त्याची दुखापत पाहून निर्णय घेतला जाणार आहे.

दरम्यान, उभय संघात तीन सामन्याची एकदिवसीय मालिका पुण्यात खेळवली जात आहे. यातील पहिला सामना भारताने ६६ धावांनी जिंकत मालिकेत १-०ने आघाडी घेतली. उभय संघातील दुसरा सामना उद्या (ता.२३) खेळला जाणार आहे.

हेही वाचा -युवराजचा 'रॉकस्टार' लूक पाहिलात का?, फोटो होतोय तुफान व्हायरल

हेही वाचा -IPL २०२१ : 'मुंबईमध्ये आपलं स्वागत आहे', MI चे खेळाडू बायो-बबलमध्ये दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details