महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL मध्ये धावांचा पाऊस पाडणारा 'हा' फलंदाज म्हणतोय, मी इंग्लंडविरुद्ध कोणत्याही क्रमांकावर खेळण्यासाठी तयार - इशान किशन न्यूज

मी इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत संघ ज्या नंबरवर खेळवेल, त्या नंबरवर खेळण्यासाठी तयार आहे. मी माझ्या क्रिकेट कारकिर्दीत टॉप ऑर्डर ते मिडल ऑर्डरमध्ये प्रत्येक क्रमांकावर खेळलो आहे. यामुळे तुम्हाला निर्णायक क्षणी कशी कामगिरी करायची, याचा अनुभव मिळतो. त्यामुळे मी कोणत्याही क्रमांकावर खेळू शकतो, असे देखील इशानने सांगितलं.

ind-vs-eng-dont-mind-batting-at-any-position-says-batsman-ishan-kishan
IPL मध्ये धावांचा पाऊस पाडणारा 'हा' आक्रमक फलंदाज म्हणतोय, मी इंग्लंडविरुद्ध कोणत्याही क्रमांकावर खेळण्यासाठी सज्ज

By

Published : Mar 13, 2021, 7:35 PM IST

अहमदाबाद - इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या ५ सामन्याचा टी-२० मालिकेसाठी, भारतीय संघात इशान किशनची निवड आहे. इशान किशनवर निवड समितीने विश्वास दाखवून संधी दिली. यासाठी त्याने समितीचे आभार मानले आहेत. तसेच मी या मालिकेत कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यास सज्ज असल्याचे देखील इशानने सांगितलं.

एका संकेतस्थळाशी बोलताना इशान म्हणाला, 'माझ्यावर विश्वास दाखवून मला भारतीय संघात संधी दिली. त्यासाठी मी आभारी आहे. भारताचे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. माझी निवड झाली. हा आनंद व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.

इशान किशन

मी इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत संघ ज्या नंबरवर खेळवेल, त्या नंबरवर खेळण्यास तयार आहे. मी माझ्या कारकिर्दीत टॉप ऑर्डर ते मिडल ऑर्डरमध्ये प्रत्येक क्रमांकावर खेळलो आहे. यामुळे निर्णायक क्षणी कशी कामगिरी करायची, याचा अनुभव मिळतो. त्यामुळे मी कोणत्याही क्रमांकावर खेळू शकतो, असे देखील इशानने सांगितलं.

इशान किशनने आयपीएलच्या १३व्या हंगामात मुंबई इंडियन्ससाठी शानदार कामगिरी केले. त्याने या हंगामात १४५.७६ च्या स्ट्राइट रेटने १४ सामन्यात ५१६ धावा केल्या. तो आयपीएल २०२० मध्ये मुंबई इंडियन्सचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. आयपीएलनंतर त्याने विजय हजारे करंडक स्पर्धेत देखील आपला फॉर्म कायम राखला. यामुळे त्याची निवड भारतीय संघात झाली आहे.

हेही वाचा -बुमराह पेक्षा 'इतक्या' वर्षांनी मोठी आहे त्याची होणारी पत्नी

हेही वाचा -टीम इंडियाची मुंबई इंडियन्सशी तुलना, इंग्लंडच्या माजी कर्णधाराला जाफरचे जबराट उत्तर

ABOUT THE AUTHOR

...view details