महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Ind vs Eng ५th t२० : नाणेफेक जिंकून इंग्लंडचा गोलंदाजीचा निर्णय; विराट रोहितसोबत सलामीला येणार - ind vs eng 5th t20 match dream11

नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत असलेल्या पाचव्या टी-२० सामन्यात इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ या सामन्यात प्रथम फलंदाजी करणार आहे.

ind vs eng 5th t20 match  : England have won the toss and have opted to field
Ind vs Eng ५th t२० : नाणेफेक जिंकून इंग्लंडचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

By

Published : Mar 20, 2021, 6:34 PM IST

Updated : Mar 20, 2021, 6:56 PM IST

अहमदाबाद -भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात आज टी-२० मालिकेतील पाचवा आणि अखेरचा निर्णायक सामना होत आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ या सामन्यात प्रथम फलंदाजी करणार आहे.

भारतीय संघाने आजच्या सामन्यात एक बदल केला आहे. मागील चार सामन्यात अपयशी ठरलेला के एल राहुलला संघातून वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी टी-२० स्पेशालिस्ट वेगवान गोलंदाज टी नटराजनला संघात संधी मिळाली आहे. इंग्लंडविरुद्धच्या निर्णायक सामन्यात कर्णधार विराट कोहली रोहित शर्मासोबत सलामीला उतरणार आहे. दुसरीकडे इंग्लंडने आपला चौथ्या सामन्यातील संघ कायम ठेवला आहे.

  • भारतीय संघ -
  • रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चाहर, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकुर आणि टी नटराजन.
  • इंग्लंडचा संघ -
  • जेसन रॉय, जोस बटलर, डेविड मलान, जॉनी बेयरस्टो, इयॉन मॉर्गन (कर्णधार), बेन स्टोक्स, सॅम करन, जोफ्रा आर्चर, मार्क वुड, ख्रिस जॉर्डन आणि आदिल रशिद.

हेही वाचा -NZ Vs Ban १st ODI : न्यूझीलंडचा बांगलादेशवर ८ गडी राखून विजय; बोल्टचे ४ बळी

Last Updated : Mar 20, 2021, 6:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details