अहमदाबाद - भारत-इंग्लंड यांच्यात चौथा टी-२० सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला जात आहे. इंग्लंडचा संघ या मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. भारतासाठी आजचा सामना 'करा किंवा मरा' अशा स्थितीतील आहे. इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ प्रथम फलंदाजी करणार आहे.
भारतीय संघात दोन बदल
चौथ्या सामन्यासाठी भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहेत. युझवेंद्र चहलला वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी राहुल चहरला अंतिम संघात स्थान देण्यात आले आहे. तर इशान किशन दुखापतीमुळे हा सामना खेळू शकणार नाही. त्याच्या जागी सूर्यकुमार यादवची अंतिम संघात वर्णी लागली आहे. दुसरीकडे इंग्लंडने आपला विजयी संघ कायम ठेवला आहे.
- भारतीय संघ -
- रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चाहर, भुवनेश्वर कुमार आणि शार्दुल ठाकुर.
- इंग्लंडचा संघ -
- इयॉन मॉर्गन (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), जेसन रॉय, डेविड मलान, बेन स्टोक्स, आदिल राशिद, ख्रिस जॉर्डन, मार्क वूड, सॅम करन, जॉनी बेयरस्टो आणि जोफ्रा आर्चर.
हेही वाचा -IND vs ENG : शार्दुलचे गचाळ क्षेत्ररक्षण, विराटचा चढला पारा; व्हिडिओ व्हायरल
हेही वाचा -IND VS ENG ४th T२० : भारताला विजय अनिवार्य, इंग्लंडला मालिका विजयाची संधी