महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

दिल्लीतील प्रदूषणाच्या गोंधळात आज रंगणार भारत विरूद्ध बांगलादेश पहिला 'टी-२०' सामना

दिल्लीतील अरूण जेटली क्रिकेट स्टेडियमवर हा सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार असून रोहित शर्मा भारतीय संघाचे तर, शाकिबच्या अनुपस्थित महमूदुल्लाह बांगलादेशचे नेतृत्व करणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेला समोर ठेऊन दोन्ही संघ युवा खेळाडूंवर आपले नशीब आजमावणार आहेत.

By

Published : Nov 3, 2019, 8:25 AM IST

ind vs bang first t20 news

दिल्ली -दिल्लीतील 'प्रदूषणाच्या' गोंधळात आज भारत विरूद्ध बांगलादेश या संघांमध्ये पहिला टी-२० सामना रंगणार आहे. गेले काही दिवस दिल्लीतील प्रदूषणामुळे या सामन्याला अनेक लोकांनी नकारघंटा दिली होती. मात्र, बीसीसीआयचा नवीन अध्यक्ष सौरव गांगुलीने 'ऐनवेळी सामन्याचे ठिकाण बदलणे अशक्य' असल्याचा कौल दिल्यानंतर या चर्चेला पूर्णविराम मिळाला होता.

हेही वाचा : हॉकीत भारताचा 'डबल' धमाका, दोन्ही संघ ठरले ऑलिम्पिकसाठी पात्र

दिल्लीतील अरूण जेटली क्रिकेट स्टेडियमवर हा सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार असून रोहित शर्मा भारतीय संघाचे तर, शाकिबच्या अनुपस्थित महमूदुल्लाह बांगलादेशचे नेतृत्व करणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेला समोर ठेऊन दोन्ही संघ युवा खेळाडूंवर आपले नशीब आजमावणार आहेत.

भारत वि. बांगलादेश टी-२० मालिका -

  • ३ नोव्हेंबर - पहिला टी-२० सामना - दिल्ली.
  • ७ नोव्हेंबर - दुसरा टी-२० सामना - राजकोट.
  • १० नोव्हेंबर - तिसरा टी-२० सामना - नागपूर.

भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, शिवम दुबे, कृणाल पांड्या, खलील अहमद, युजवेंद्र चहल, दीपक चाहर, राहुल चाहर, संजू सॅमसन, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर.

बांगलादेश संघ -
महमूदुल्लाह (कर्णधार), लिटन दास, सौम्या सरकार, नईम शेख, मुशफिकुर रहीम, मोहम्मद मिथून, आफिफ हुसेन, मोसद्देक हुसेन,अमीन इस्लाम, अराफात सनी, तयाजुल इस्लाम, मुस्तफिजूर रहमान, शफीउल इस्लाम, अबू हैदर, अल अमीन हुसेन.

हेही वाचा : दिल्लीत बांगलादेशी खेळाडूंवर मास्क लावून सराव करण्याची वेळ, बीसीसीआयची नामुष्की

ABOUT THE AUTHOR

...view details