महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

आम्ही जिंकत होतो तेव्हा विराटचा जन्मही झाला नव्हता, 'दादा'च्या स्तुतीवर लिटल मास्टर कोहलीवर भडकले

कर्णधार विराट कोहलीने कोलकाता कसोटीतील विजयानंतर २००० च्या दशकात सौरव गांगुलीनं भारताच्या लढाऊ वृत्तीचा पाया रचला. गांगुलीने विजयाची सुरूवात केली. आम्ही ही परंपरा पुढे नेत आहोत, असं सांगत गांगुलीचे कौतूक केले. विराटच्या या मतावर लिटल मास्टर सुनील गावस्कर खवळले आणि त्यांनी विराटचा खरपूस समाचार घेतला.

आम्ही जिंकत होतो तेव्हा विराटचा जन्मही झाला नव्हता, 'दादा'ची स्तुतीवर लिटल मास्टर कोहलीवर भडकले

By

Published : Nov 24, 2019, 8:57 PM IST

नवी दिल्ली - भारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वात बांगलादेश विरुध्दचा ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामना १ डाव ४६ धावांनी जिंकला. या विजयासह भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अव्वलस्थान बळकट केले. कर्णधार विराट कोहलीने कोलकाता कसोटीतील विजयानंतर २००० च्या दशकात सौरव गांगुलीनं भारताच्या लढाऊ वृत्तीचा पाया रचला. गांगुलीने विजयाची सुरूवात केली. आम्ही ही परंपरा पुढे नेत आहोत, असं सांगत गांगुलीचे कौतूक केले. विराटच्या या मतावर लिटल मास्टर सुनील गावस्कर खवळले आणि त्यांनी विराटचा खरपूस समाचार घेतला.

घडलं असं की, बांगलादेश विरुध्दच्या विजयानंतर संजय मांजरेकर यांनी विराटला भारतीय गोलंदाजांविषयी प्रश्न विचारले. तेव्हा उत्तर देताना विराटने सौरव गांगुलीचे कौतूक केले. विराटचे हे कौतूक सुनिल गावस्कर यांना आवडलं नाही. त्यांनी विराटची प्रतिक्रिया ऐकून असं वाटू लागलं की भारतीय क्रिकेटची सुरुवात ९० च्या मध्यंतरापासून किंवा २००० पासून सुरू झाली. भारतीय संघ ७० च्या दशकातही विजय मिळवत होता. असं सांगितलं.

पुढे बोलताना गावस्कर म्हणाले, 'गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष आहे, यामुळेच त्याच्याबद्दल चांगल्या गोष्टी बोलावे लागतात. पण, आज मला असं वाटू लागल आहे की भारतीय क्रिकेटची सुरुवात १९९४ पासून झाली. पण, विराटचा जन्म हा १९८८ चा आहे त्यामुळेच त्याला हे माहित नसावे की ७० ते ८० या काळातही भारतीय संघ कसोटी मालिका जिंकत होता.

हेही वाचा -'ईशांत, शमी आणि उमेश एकत्र येऊन 'शिकार' करतात', विराटने केले कौतुक

हेही वाचा -बॉर्डर यांच्या मोठ्या विक्रमाला कोहलीने पछाडले, यादीत मिळवले पाचवे स्थान

ABOUT THE AUTHOR

...view details