कोलकाता - बांगलादेश विरुध्दच्या ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने शानदार शतक झळकावलं. बांगलादेशचा पहिला डाव १०६ धावात गुंडाळला. त्यानंतर विराटचे शतक चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर भारताने कसोटीवर मजबूत पकड मिळवली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार या नात्याने विराटचे हे ४१ वे शतक ठरले. या कामगिरीसह विराटने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगशी बरोबरी साधली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार या नात्याने सर्वाधिक शतके ठोकणारे फलंदाज - –
- रिकी पाँटिंग - ४१ शतके
- विराट कोहली - ४१ शतके
- ग्रॅमी स्मिथ - ३३ शतके
- स्टीव्ह स्मिथ - २० शतके
विराट कोहलीने दिवस-रात्र कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात खेळताना १९४ चेंडूत १३६ धावा केल्या. यामध्ये त्याने १८ चौकार ठोकले.