महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

पत्रकार परिषदेत फोन वाजला आणि रोहित संतापला, म्हणाला 'बॉस...' - press conference with rohit sharma

रोहित शर्मा पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होता. तेव्हा अचानक एका पत्रकाराचा फोन वाजला. यावेळी रोहित काही क्षणांसाठी थांबला आणि म्हणाला बॉस, प्लीज तुमचा फोन सायलेंटवर ठेवा, असे सांगत त्याने आपले बोलणे पुढे चालू ठेवले.

पत्रकार परिषदेत फोन वाजला आणि रोहित संतापला, म्हणाला 'बॉस...'

By

Published : Nov 7, 2019, 4:05 PM IST

Updated : Nov 7, 2019, 4:12 PM IST

राजकोट- भारत विरुध्द बांगलादेश संघात आज (गुरूवार) दुसरा टी-२० सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या मैदानावर रंगणार आहे. मात्र अरबी समुद्रातील 'महा' चक्रीवादळामुळे या सामन्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात येते आहे. यामुळे हा सामना पूर्ण होणार की नाही याबद्दल सांगणे कठिण बनले आहे. दरम्यान, सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्माचे एक वेगळेच रुप पाहायला मिळाले.

रोहित शर्मा पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होता. तेव्हा अचानक एका पत्रकाराचा फोन वाजला. यावेळी रोहित काही क्षणांसाठी थांबला. आणि म्हणाला बॉस, प्लीज तुमचा फोन सायलेंटवर ठेवा. असे सांगत त्याने आपले बोलणे पुढे चालू ठेवले.

दरम्यान, भारत-बांगलादेश संघामध्ये ३ सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना बांगलादेश संघाने ७ गडी राखून जिंकत १-० अशी आघाडी घेतली. त्यामुळे भारतीय संघ दुसऱ्या सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याच्या प्रयत्नात आहे. जर भारताने आजचा सामना जिंकल्यास मालिकेत १-१ ने बरोबरी साधेल. पण बांगलादेशने आजचा सामना जिंकला तर भारतीय संघावर पहिल्यादांच बांगलादेश संघाविरुध्द टी-२० मालिका गमावण्याची नामुष्की येईल.

हेही वाचा -भारत विरुध्द बांगलादेश सामना : आज होऊ शकतात 'हे' विक्रम

हेही वाचा -IND VS BAN 2nd T-20 : टीम इंडिया हिशोब चुकता करण्याच्या उद्देशानं मैदानात

Last Updated : Nov 7, 2019, 4:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details