महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 27, 2019, 8:18 AM IST

ETV Bharat / sports

भारत-बांगलादेश सामन्यापूर्वी प्रदूषण बनला चिंतेचा विषय

मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी दिल्ली विद्यापीठाचा एक्यूआय ३५७ इतका होता. हा एक्यूआय खराब मानला जातो. या विषयावर बोलताना बीसीसीआय आणि डीडीसीएचे अधिकाऱ्याने सांगितले की, 'खराब वायू प्रदूषणावर आमचे काही नियंत्रण नाही. हा सामना दिवाळीच्या एका आठवड्यानंतर असता तर तेव्हापर्यंत प्रदूषणाची स्थिती नियंत्रणात आली असती. मात्र,  याकरणाने खेळाडूंना प्रकृतीबाबत कुठली अडचण येणार नाही, अशी आम्ही आशा करतो.'

भारत-बांगलादेश सामन्यापूर्वी प्रदूषण बनला चिंतेचा विषय

नवी दिल्ली - बांगलादेशचा संघ नोव्हेंबरच्या सुरुवातीला भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात बांगलादेशचा संघ भारताविरुध्द ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ३ नोव्हेंबरला फिरोजशाह कोटलाच्या मैदानावर खेळला जाणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वी राजधानी दिल्लीतील 'प्रदूषण' हा चिंतेचा विषय बनला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी दिल्ली विद्यापीठाचा एक्यूआय ३५७ इतका होता. हा एक्यूआय खराब मानला जातो. या विषयावर बोलताना बीसीसीआय आणि डीडीसीएचे अधिकाऱ्याने सांगितले की, 'खराब वायू प्रदुषणावर आमचे काही नियंत्रण नाही. हा सामना दिवाळीच्या एका आठवड्यानंतर असता तर तेव्हापर्यंत प्रदूषणाची स्थिती नियंत्रणात आली असती. मात्र, याकरणाने खेळाडूंना प्रकृतीबाबत कुठली अडचण येणार नाही, अशी आम्ही आशा करतो.'

दरम्यान, डिसेंबर २०१७ मध्ये श्रीलंकेच्या संघाला दिल्लीच्या मैदानावर कसोटी सामन्यादरम्यान, प्रदूषणाच्या त्रासाला सामोरे जावे लागले होते. तेव्हा अनेक खेळाडूंना मास्क घालून खेळावे लागले. यानंतर काही खेळाडू आजारीही पडले होते. यामुळे याची खबरदारी म्हणून बांगलादेशच्या संघाला आपल्यासोबत मास्क ठेवण्याची विनंती करण्यात येऊ शकते.

हेही वाचा -बांगलादेशच्या 'या' अनुभवी खेळाडूने घेतली भारत दौऱ्यातून माघार

हेही वाचा -जेव्हा पंतप्रधान क्रिकेटपटूंसाठी पाण्याच्या बाटल्या घेऊन मैदानात धावतात

ABOUT THE AUTHOR

...view details