इंदूर- बांगलादेश विरुध्दचा पहिला कसोटी सामना भारतीय संघाने एक डाव १३० धावांनी जिंकला. होळकर मैदानात रंगलेल्या या सामन्यात प्रेक्षकांनी बांगलादेशच्या मुश्फीकुर रहिमची हुर्ये उडवली. याचा एक व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मुश्फीकुर रहिम बाऊंड्री लाईन जवळ क्षेत्ररक्षण करताना दिसत आहे. यावेळी प्रेक्षकांनी त्याला उद्देशून '२ रुपये की पेप्सी, रहीम भाई सेक्सी' अशा घोषणा दिल्या.
दरम्यान, भारताने हा सामना जिंकला असला तरी, रहिमने या सामन्यात चिवट खेळी केली. त्याने पहिल्या डावात ४३ तर दुसऱ्या डावात ६४ धावा केल्या. भारतीय संघाने मोठ्या विजयासह २ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.