महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला पळवून पळवून मारलं, पाक खेळाडूने केली ब्लू आर्मीची स्तूती - ind vs aus odi series 2020

शोएब अख्तरने आपल्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केला असून त्यात तो भारतीय संघाचे कौतूक करताना दिसून येत आहे. यात तो म्हणतो, 'एकेकाळी ऑस्ट्रेलिया संघ फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावर आम्हाला आणि भारताला पळवत होता. त्या ऑस्ट्रेलिया संघाला भारताने आज पळवलं. भारताने त्यांना पळवलं नाही तर अक्षरशः पळवून पळवून मारलं. ऑस्ट्रेलियाची मारून मारून बेकार अवस्था केली.'

ind vs aus : Shoaib Akhtar  Says Kohli & Men Hammered And Bullied Australia In Battle Of Pride
टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया पळवून पळवून मारलं, पाक खेळाडूने केली ब्लू आर्मीची स्तूती

By

Published : Jan 20, 2020, 2:28 PM IST

Updated : Jan 20, 2020, 4:48 PM IST

हैदराबाद - भारतीय संघाने रोहित शर्माचे धडाकेबाज शतक आणि कर्णधार विराट कोहलीच्या झंझावाती अर्धशतकी खेळीच्या जोरावर अखेरच्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवत मालिकेत २-१ ने बाजी मारली. भारताच्या या विजयानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने 'ब्लू आर्मी'चे तोंडभरून कौतूक केले.

शोएब अख्तरने आपल्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केला असून त्यात तो भारतीय संघाचे कौतूक करताना दिसून येत आहे. यात तो म्हणतो, 'एकेकाळी ऑस्ट्रेलिया संघ फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावर आम्हाला आणि भारताला पळवत होता. त्या ऑस्ट्रेलिया संघाला भारताने आज पळवलं. भारताने त्यांना पळवलं नाही तर अक्षरशः पळवून पळवून मारलं. ऑस्ट्रेलियाची मारून मारून बेकार अवस्था केली.'

Last Updated : Jan 20, 2020, 4:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details