मुंबई- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरूवात होत आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये उभय संघात आज पहिला सामना खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजचा सामना जिंकून दोन्ही संघांचा विजयी सुरूवात करण्याचा निर्धार आहे. दरम्यान, दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने, कडवी टक्कर पाहण्याची संधी क्रिकेटप्रेमींना आहे.
पहिल्या सामन्यात भारतीय संघाने शिखर, रोहित आणि राहुल या तिन्ही फलंदाजांना संधी दिली आहे. तर गोलंदाजीची भिस्त जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर यांच्यावर आहे. त्यांना फिरकीपटू कुलदीप यादवची साथ असणार आहे.
भारतीय डावाची सुरूवात रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी केली.